चेहऱ्यावरील भाव पाहून गुन्हेगाराचा खरेपणा ओळखणारी सिस्टम; मुंबई पोलीस चाचणी घेण्याची शक्यता

गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून गुन्हेगार खरे बोलत आहे की खोटे हे सांगणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या एआय टेक्नॉलॉजीच्या (Artificial Intelligence Systems) संभाव्य व्यावहारिक अनुप्रयोगांबद्दल चाचणी घेण्यासाठी कंपनी यूके आणि मुंबई पोलिसांशी संपर्कात आहे

चेहऱ्यावरील भाव ओळखणारी प्रणाली (संग्रहित-संपादित प्रतिमा)

वाढती गुन्हेगारी ही पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात पकडला गेलेला गुन्हेगार खरे बोलत आहे की खोटे हे तपासणे मोठे दिव्य असते. या चौकशी दरम्यान पोलिसांचा बराच वेळ आणि एनर्जी खर्च होते. याच गोष्टीवर उपाय म्हणून गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून गुन्हेगार खरे बोलत आहे की खोटे हे सांगणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या एआय टेक्नॉलॉजीच्या (Artificial Intelligence Systems) संभाव्य व्यावहारिक अनुप्रयोगांबद्दल चाचणी घेण्यासाठी कंपनी यूके आणि मुंबई पोलिसांशी संपर्कात आहे. त्यामुळे लवकरच मुंबई पोलीस या प्रणालीची चाचणी घेण्याची शक्यता आहे.

हे चेहरा स्कॅनिंग तंत्रज्ञान मायक्रो-एक्सप्रेशन्सवर काम करते. अगदी लहान, ओळखताही न येणारे चेहऱ्यावरील भाव ही प्रणाली ओळखते. ज्यामुळे जर का कोणी खोटे बोलत असेल अथवा सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो भाव ही प्रणाली पकडू शकणार आहे. लंडनस्थित (London) स्टार्टअप फेससॉफ्ट (Facesoft) यांनी अशाप्रकारची प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली मध्ये तब्बल 300 दशलक्ष विविध हावभाव समाविष्ट केले आहेत. या डेटाबेसच्या आधारावर सूक्ष्म भावदेखील ओळखता येणार आहेत. (हेही वाचा: असला सेल्फी नको रे बाबा! सेल्फीच्या नादात उंच इमारतीवरून कोसळला तरुण; मुंबई पोलिसांनी शेअर केला व्हिडीओ

1960 च्या दशकात पहिल्यांदा डोक्यातील विचार आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा संबंध जोडला गेला. आत्महत्या करणाऱ्या पेशंट्समध्ये ही गोष्ट आढळली होती. आता विकसित केलेल्या या प्रणालीमध्ये सर्व वयोगटातील आणि सर्व लिंगाच्या लोकांचे हावभाव समाविष्ट केले गेले आहेत. जेणेकरून ही प्रणाली गुन्हेगारांच्या डोक्यात चाललेले विचार त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावाद्वारे ओळखू शकेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement