Twitter Recommended Features: Elon Musk ने ट्विटरवर जोडले 'हे' खास फिचर; काय आहे खास? जाणून घ्या

अधिकाधिक वापरकर्ते आकर्षित करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी एलोन मस्क (Elon Musk) च्या योजनेअंतर्गत हे वैशिष्ट्य जोडले जात आहे.

Elon Musk and Twitter (PC - Wikimedia commons)

Twitter Recommended Features: तुम्ही ट्विटर यूजर (Twitter User) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Twitter आता तुम्हाला तुम्ही फॉलो करत नसलेल्या लोकांचेही ट्वीट दाखवणार आहे. अधिकाधिक वापरकर्ते आकर्षित करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी एलोन मस्क (Elon Musk) च्या योजनेअंतर्गत हे वैशिष्ट्य जोडले जात आहे. कंपनीने सांगितले की, सर्व वापरकर्त्यांना सर्वोत्तम कंटेंट प्रदान करण्यासाठी ती सूचनांचा विस्तार करेल.

नवीन योजनेबद्दल पोस्ट करताना, Twitter ने म्हटले आहे की, 'आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की प्रत्येकजण Twitter वर सर्वोत्कृष्ट कंटेट पाहतो, म्हणून आम्ही रेकमेंडेड वैशिष्ट्याचा सर्व वापरकर्त्यांसाठी विस्तार करत आहोत, ज्या अंतर्गत आता वापरकर्त्यांनी फॉलो न केलेले ट्विट अकाऊंडही त्यांना रेकमेंडेड करण्यात येणार आहेत. रेकमेंडेड केलेले ट्विट हे वापरकर्त्यांच्या आवडी, त्यांनी फॉलो केलेले विषय, ते ज्या ट्विटमध्ये जास्त वेळ असतात आणि त्यांच्या नेटवर्कमधील लोकांच्या ट्विटच्या आधारे निर्धारित केले जातील. (हेही वाचा - Twitter On iPhone: अॅप स्टोअरवरुन ट्विटर गायब होणार? एलॉन मस्क यांचं खळबळजनक ट्विट)

कंपनीच्या मते, रेकमेंडेड केलेले ट्विट तुमच्या होम टाइमलाइनमध्ये, एक्सप्लोर टॅबसारख्या ठिकाणी आणि तुमच्या ट्विट्सच्या मध्यभागी दिसू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, केवळ उच्च गुणवत्तेच्या कटेंटची शिफारस केली जाईल याची खात्री करण्यासाठी, आम्ही केवळ आमच्या रेकमेंडेड टीमवर काम करत आहोत. ही टीम सर्व गोष्टींची काळजी घेतल्यानंतरच कोणत्याही युजरला कोणत्याही ट्विटची रेकमेंडेड करेल. (हेही वाचा - Elon Musk: अॅपल अँड्रॉइड फोनला टक्कर देण्यास एलॉन मस्क सज्ज, लवकरच लॉंच करणार ब्राण्ड न्यू स्मार्टफोन?)

कंपनीने असेही सांगितले आहे की, शिफारस केलेले ट्विट वैयक्तिकृत करण्यासाठी काही टूल्स देखील दिले जातील. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अटींवर Twitter वापरण्यास सक्षम करण्याचा हा एक महत्त्वाचा भाग असेल. इतकेच नाही तर तुम्हाला ट्विट मेनूमध्ये 'या ट्विट/विषयामध्ये रस नाही' असा पर्यायही मिळेल. यात तुम्ही निवडलेले ट्विट तुम्हाला पुन्हा दाखवले जाणार नाही.