विजेचे बिल कमी करण्यासाठी खास '7' ट्रिक्स !

त्यामुळे नक्कीच विजेचे बिल कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया या ट्रिक्स...

वीज बिल बचतीचे मार्ग (Photo Credit : Pixabay)

तुम्हालाही विजेचे बिल जास्त येते का? नेहमीच्या जास्त येणाऱ्या बिलामुळे तुम्हीही त्रासले आहात का? मग ही माहिती तुमच्या कामाची आहे. जास्त येणाऱ्या बिलापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. त्यामुळे नक्कीच विजेचे बिल कमी होण्यास मदत होईल.

जाणून घेऊया या खास ट्रिक्स...

एनर्जी सेव्हींग

AC, Fridge किंवा Washing Machine यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्यावर रेटींग स्टार किती आहेत, ते तपासा. प्रत्येक कंपनी आपल्या मशीनला रेटींग देते. या रेटींगच्या आधारावर मशीन किती वीज खर्च वापरते, हे ठरते. उदा. जर AC चे रेटींग 1 स्टार असेल तर याचा अर्थ हा AC अधिक वीज खर्च करतो. जर AC ला 5 स्टार्स मिळाले असतील तर याचा अर्थ AC सर्वात कमी वीज खर्च करतो. अधिक स्टार्स असलेल्या वस्तू हा काहीशा महाग तर कमी स्टार्स असलेल्या वस्तू या तुलनेत स्वस्त असतात. पैसे वाचवण्याच्या नादात कमी स्टार्स असलेल्या वस्तू खरेदी करत असाल तर नंतर पश्चाताप करावा लागेल. एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रोनिक वस्तूंची काळजी कशी घ्यावी ?

कारण 1 स्टार असलेला 1 टन चा AC खरेदी केलात. याची किंमत असेल 20 हजार रुपये. पण AC प्रत्येक महिन्यात 5 तास चालू ठेवल्यास 5 हजार रुपये खर्च करावे लागतील. त्याव्यतिरिक्त जर 5 स्टार असलेला 1 टन च्या AC ची किंमत 30 हजार असेल. पण हा AC 5 तास चालवल्यास 2 हजार रुपयेच बिल द्यावे लागेल. याचा अंदाज लावा आणि त्यानुसार खरेदी करा.

LED बल्ब

LED बल्ब काहीसे महाग असतात. पण कमी वीज खर्च करतात. याशिवाय LED बल्बची लाईफ इतर बल्बच्या तुलनेत अधिक असते. तुम्ही जर घरात LED बल्ब लावलेत तर वीजेचे बिल अर्धे होईल.

आवश्यक डिव्हाईसचा वापर

रुममध्ये नसताना पंखा, दिवे, AC बंद करा. टी.व्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आवश्यक नसल्यास बंद ठेवा. त्यामुळे विजेच्या बिलात खूप फरक जाणवेल.

विजेचे बिल वेळेत भरा

विजेचे बिल वेळेत न भरल्यास फाईन भरावा लागतो आणि विनाकारण खर्च वाढतो. त्यामुळे वेळेत बिल भरणे केव्हाही उत्तमच.

सेव्हींग मोड डिव्हाईस

प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये सेव्हींग मोड किंवा स्लीप मोड असतो. याचा वापर करुन तुम्ही विजेचे बिल कमी करु शकता.

सर्व्हीसिंग

जुने किंवा खराब डिव्हाईसमुळे विजेचे बिल अधिक येते. त्यामुळे घरात वापरणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसची वेळोवेळी सर्व्हीसिंग होणे गरजेचे आहे.

विजेचे बिल अधिक येण्यामागचे कारण

महिन्याला तुम्हाला विजेचे बिल किती येते, याचा अंदाज घ्या. अधिक बिल आल्यास त्यामागचे कारण शोधा आणि त्यावर उपाय करा.