Republic Day Parade 2021 App: यंदाचं प्रजासत्तक दिनाचं सेलिब्रेशन, चित्ररथ लाईव्ह पाहण्यासाठी MoD ने लॉन्च केलं खास अॅप
राजपथावरील संचलन, चित्ररथ, फ्लाय पास्ट, सांस्कृतिक सोहळे या सोबतच दिल्लीतील कार्यक्रम स्थळाजवळील पार्किंग सोय, रूट मॅप देखील या अॅपमध्ये लाईव्ह पाहता येणार आहेत.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर खास मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप Republic Day Parade 2021 किंवा RDP 2021 या नावाने डाऊनलोडसाठी उपलबब्ध करण्यात आलं आहे. दरम्यान हे अॅण्ड्राईड प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअर वर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. या अॅपच्या मदतीने लोकांना यंदाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. यामध्ये राजपथावरील संचलन, चित्ररथ, फ्लाय पास्ट, सांस्कृतिक सोहळे या सोबतच दिल्लीतील कार्यक्रम स्थळाजवळील पार्किंग सोय, रूट मॅप देखील लाईव्ह पाहता येणार आहे. Tableau of Maharashtra 2021: प्रजासत्ताक दिनी यंदा संत परंपरेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाची इथे पहा झलक (Watch Video).
दरम्यान दरवर्षी 26 जानेवारीच्या सोहळ्याला लाखो लोकांची उपस्थिती असते पण यंदा कोरोना वायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर तयारी मर्यादित स्वरूपात आणि नेमक्याच लोकांसाठी करण्यात आली आहे. यंदाचा भारताचा प्रजासत्तक दिन सोहळा हा परदेशी पाहुण्यांशिवायच पार पडणार आहे. Bhawana Kanth, यंदा 26 जानेवारीला Republic Day Parade मध्ये सहभागी होणारी पहिली Woman Fighter Pilot.
डाऊनलोड कसं आणि कुठून कराल Republic Day Parade 2021 अॅप?
प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअर वर तुम्ही अॅपचं नाव सर्च करून ते डाऊनलोड करू शकता. त्यानंतर डाऊनलोड करून ते इंस्टॉल करण्याचा पर्याय उपलब्ध असे. यासाठी काही क्यु आर कोडदेखील आहेत. तसेच खालील लिंक्सवरून देखील ते उपलब्ध होऊ शकतात.
Android वर https://play.google.com/store/apps/details?id=com
iOS - https://apps.apple.com/in/app/id1449946172
भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला युके पंतप्रधान बोरिस जॉन्सन हजर राहणार होते. मात्र त्यांचा भारत दौरा कोविडच्या पार्श्वभूमीवर रद्द झाला आहे. तसेच अटारी बॉर्डरवर देखील जॉईंट परेड यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर रद्द झाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)