Dangerous Malware In over 100 Android Apps: धक्कादायक! 100 हून अधिक अँड्रॉइड अॅप्समध्ये मध्ये आढळले धोकादायक मालवेअर्स
जवळपास 100 अँड्रॉइड अॅप्समध्ये धोकादायक मालवेअर सापडली आहेत. तुमच्याही मोबाईलमध्ये ती आढळल्या अशी अॅप त्वरीत हटवणे केव्हाही चांगले. घ्या जाणून. धक्कादायक म्हणजे ही मालवेअर Google Play Store आढळली आहेत.
Dangerous Malware Found in Android Apps: इटरनेटच्या जगतात मालवेअर ही बाब आता नवी नाही. पण, म्हणून त्याचा धोका कमी झाला आहे असे मुळीच नाही. अनेकदा ही मालवेअर्स हॅकर मंडळी सायबर क्राईम करण्यासाठी वापरतात. ज्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडतो. त्यांची खासगी माहितीही अनेकदा लिक होते. तंत्रज्ञानातील अभ्यासक मंडळी नेहीमी अशा मालवेअर्सच्या शोधात असतात. जेणेकरुन ही मालवेअर शोधून वापरकर्त्यांना तातडीने सतर्क करता येते. आताही जवळपास 100 अँड्रॉइड अॅप्समध्ये धोकादायक मालवेअर सापडली आहेत. तुमच्याही मोबाईलमध्ये ती आढळल्या अशी अॅप त्वरीत हटवणे केव्हाही चांगले. घ्या जाणून. धक्कादायक म्हणजे ही मालवेअर Google Play Store आढळली आहेत.
संशधकांनी अलिकडेच BleepingComputer च्या सहकार्याने 'SpinOK' नावाचे एक नवीन स्पायवेअर शोधले आहे. जे अँड्राइड प्रणालीवर Google Play Store द्वारे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जवळपास 100 अॅप्सवर सक्रीय आहे.धक्कादायक म्हणजे हे इतके चिंताजनक आहे की, आतापर्यंत या अॅप्सना तब्बल 400 दशलक्ष हून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. (हेही वाचा, आर्टिफॅक्टने नवीन फिचर केले लाँच, आता आर्टिकलची हेडलाइन पुन्हा एडिट करू शकणार क्लिकबेट)
संशोधकांना आढळलेली धोकादायक मालवेअर्स
- Noizz: video editor with music (at least 100,000,000 installations).
- Zapya - File Transfer, Share (at least 100,000,000 installations; the trojan
- module was present in version 6.3.3 to version 6.4 and is no longer present in current version 6.4.1).
- VFly: video editor&video maker (at least 50,000,000 installations).
- MVBit - MV video status maker (at least 50,000,000 installations).
- Biugo - video maker&video editor (at least 50,000,000 installations).
- Crazy Drop (at least 10,000,000 installations).
- Cashzine - Earn money reward (at least 10,000,000 installations).
- Fizzo Novel - Reading Offline (at least 10,000,000 installations).
- CashEM: Get Rewards (at least 5,000,000 installations).
- Tick: watch to earn (at least 5,000,000 installations).
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधकांनी शोधलेले हे मालवेअर स्वतःला जाहिरात SDK म्हणून सादर करते. अधिकाधिक वापरकर्त्यांना आकर्शित करण्यासाठी ते नियमीत माहिती, मीनीगेम्स ऑफर करते. जेणेकरुन लोकांना वाटते की ते अधिकृत आहे. पण, वापरकर्त्याने एकदा का हे मालवेअर डाऊनलोड केले की, ते सक्रीय होते आणि वापरकर्त्याच्या उपकरणावरील खासगी माहिती चोरते आणि रिमोट सर्व्हरवर पाठवते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)