COVID Vaccine Google Doodle: माझ्या जवळपासचे COVID लसीकरण केंद्र ची माहिती देणारं खास गूगल डूडल

त्यापैकी 27.6 कोटी लोकांचं लसीकरण दोन्ही डोसचे झाले आहे म्हणजेच पूर्ण लसवंतांचं प्रमाण 20% आहे.

COVID 19 Vaccine | PC: Google Homepage

जगावरील अद्याप कोविड 19 संकट पूर्णपणे शमलेलं नाही. मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणं आणि सोशल डिस्ट्न्सिंग पाळणं यासोबतच आता कोविड 19 लसीकरण (COVID 19 Vaccine) हे देखील महत्त्वाचं आहे. कोविड 19 लसीकरणाबाबत सामाजात जनजागृती पसरवण्यासाठी आज (16 ऑक्टोबर) गूगलच्या होमपेज वर पुन्हा एकदा खास अ‍ॅनिमेटेड गूगल डूडल (Animated Google Doodle) प्रसिद्ध करण्यात आले आहे. गूगलच्या प्रत्येक अक्षरामधून लस घेण्याचा सल्ला घेतल्याचं प्रतिनिधित्त्व झळकत आहे. दरम्यान आजच्या गूगल डूडलवर क्लिक केल्यानंतर तुम्हांला 'माझ्या जवळपासचे COVID लसीकरण केंद्र' (Covid Vaccine Near Me) याची देखील माहिती दिली जात आहे. नक्की वाचा: COVID-19 Vaccination: कोविड 19 लसीकरणासाठी जवळचं केंद्र Google Maps च्या मदतीने कसं शोधाल पहा स्टेप बाय स्टेप .

दरम्यान जगात सध्या 6.61 अब्ज लोकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये 2.81% पूर्ण लसवंत आहेत. म्हणजेच 36.1% लोकांचे लसीकरण झाले आहे. तर भारताचा विचार करता 2 दिवसांपूर्वीपर्यंत 96.8% लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी 27.6 कोटी लोकांचं लसीकरण दोन्ही डोसचे झाले आहे म्हणजेच पूर्ण लसवंतांचं प्रमाण 20% आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सध्या लस हेच एक शस्त्र आपल्याकडे असल्याने स्वतःला आणि आजुबाजूच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लस घेणं आवश्यक आहे. Google India कोविड-19 लसीकरण केंद्र शोधण्यासाठी करणार युजर्स मदत; Health Ministry आणि Bill Gates Foundation सोबत भागीदारी .

भारतामध्ये सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक अशा 3 लसी उपलब्ध आहे. या लसी सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत उपलब्ध आहेत तर खाजगी रूग्णालयात सशुल्क दिल्या जात आहेत. लस घेतली असली तरीही मास्कचा वापर करणं आवश्यक असल्याचेही सरकारने सांगितले आहे. त्यामुळे कोविड नियमावलीचं पालन करून पुन्हा जनजीवन सुरळित आणण्यासाठी अधिकाधिक लोकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे.