IPL Auction 2025 Live

व्यवसायासाठी WhatsApp चा वापर करणाऱ्या कंपन्याना Facebook आता शुल्क आकारणार- रिपोर्ट्स

व्यवसायासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांना शुल्क आकारले जाणार असे फेसबुकने गुरुवारी जाहीर केले.

Facebook to Start Charging Companies Using WhatsApp for Business (Photo Credits: IANS)

व्यवसायासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरणाऱ्यांना आता त्यासाठी किंमत मोजावी लागणार आहे. व्यवसायासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांना शुल्क आकारले जाणार असे फेसबुकने (Facebook) गुरुवारी जाहीर केले. व्हॉट्सअॅप बिजनेस अकाऊंटमध्ये लवकरच युजर्स प्रॉडक्टची खरेदी चॅटच्या माध्यमातून देखील करु शकतील. जवळपास 50 मिलियन व्यवसाय व्हॉट्सअॅपद्वारे सुरु असून 175 मिलियन लोक व्यवसायासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. या निर्णयामुळे व्हॉट्सअॅपला आपला व्यवसाय वाढवण्यास नक्कीच मदत होईल. सध्या व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही फोटोज, व्हिडिओज , व्हाईस क्लिप्स अगदी सहज जगात कोठेही पाठवू शकता. त्याचबरोबर व्हाईस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही व्हॉट्सअॅप युजर्सला प्रदान करतं.

व्हॉट्सअॅपने आपल्या निवेदनात म्हटले की, व्यावसायिकांसाठी आम्ही आमचे फिचर्स अगदी सहज सोपे करु इच्छितो. यामुळे अनेक व्यवसायांना याचा फायदा होईल. लवकरच व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एखादी वस्तू कार्टमध्ये अॅड करणे आणि चेक आऊट करुन ती वस्तू खरेदी करणे शक्य होणार आहे. या फिचरमुळे कोविड संकटात नुकसान झालेल्या व्यवसांना फायदा मिळवण्यास मदत होईल. परंतु, काही सेवांसाठी व्यावसायिकांना शुल्क आकारण्यात येतील. भविष्यात आम्ही अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच व्यवसाय अधिक उत्तमरित्या हाताळण्यासाठी आम्ही युजर्संना आम्ही नवा पर्याय देखील उपलब्ध करुन देणार आहोत, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

या नवीन सुविधेत शॉपिंग बटण अॅड करण्यात आले आहे. गुरुवारी ते जगभरात लाईव्ह झाले. भारतात ते लवकरच सादर होईल. बिझनेस सोल्यूशन प्रोव्हायडर सोबत असलेली पार्टनरशीप विस्तारीत करण्याची व्हॉट्सअॅपची योजना आहे. यामुळे लहान आणि मध्यम स्वरुपाचे व्यवसाय सहज सुरु करणे, वस्तू विकणे आणि झालेल्या विक्रीचा हिशोब ठेवणे अगदी सोयस्कर होईल. त्याचप्रमाणे जगभरातील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणे सहज शक्य होईल.

व्हॉट्सअॅप बिजनेसची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. जगभरातील लाखो लोकांना आणि व्यवसायिकांना वस्तू विकण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी सोपा मार्ग उपलब्ध झाला होता. भारतातील 81% प्रौढांनुसार, टेक्स मेसेजपेक्षा व्हॉट्सअॅपद्वारे बिझनेस क्मुनिकेशनचा एक फास्ट पर्याय उपलब्ध झाला होता. (WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! आता लॅपटॉपच्या माध्यमातून करता येणार Audio आणि Video कॉलिंग)

कुटुंबिय, मित्रपरिवारासोबत संवाद साधल्याप्रमाणे बिजनेस क्मुनिकेशन होतं असं भारतातील सुमारे 77% लोकांनी सांगितले आहे. तर जगभरातील 80% लोकांनी व्हॉट्सअॅपहा बिझनेस क्मुनिकेशनचा जलद आणि सोपा पर्याय असल्याचे म्हटले आहे.