Chinese Links Apps Ban in India: चीनशी संबंधीत 138 बेटिंग अॅप्स, 94 लोन लेंडिंग अॅप्सवर भारतात बंदी, केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने (Central Government) एका व्यापक पातळीवर चीनी कंपन्यांशी संबंधीत अॅप्सवर (Chinese Links Apps)डिजिटल स्ट्राईक केला आहे. 'तातडी' आणि 'आणीबाणी' (Emergency) स्थिती म्हणून निर्णय घेत 138 सट्टेबाजी अॅप्स आणि 94 कर्ज देणारे अॅप्स चिनी लिंक्सवर बंदी घालण्याची आणि ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Ministry of Home Affairs (Photo Credit: ANI)

केंद्र सरकारने (Central Government) एका व्यापक पातळीवर चीनी कंपन्यांशी संबंधीत अॅप्सवर (Chinese Links Apps)डिजिटल स्ट्राईक केला आहे. 'तातडी' आणि 'आणीबाणी' (Emergency) स्थिती म्हणून निर्णय घेत 138 सट्टेबाजी अॅप्स आणि 94 कर्ज देणारे अॅप्स चिनी लिंक्सवर बंदी घालण्याची आणि ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकाच्या उच्चस्तरीय सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्था एएनायने याबाबत वृत्त दिले आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) गृह मंत्रालयाने (MHA) केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेतल्याचे समजते.

सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, MHA ने या आठवड्यात MeitY ला या अॅप्सवर बंदी घालण्याची आणि ब्लॉक करण्याची शिफारस केली. त्यानंतर झालेल्या संवादानुसार मंत्रालयाने प्रक्रिया सुरू केली. मंत्रायाने केलेल्या चौकशीत हे अॅप्स IT कायदा कलम 69 ला ( IT Act Section 69 ) चे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले. कायद्यानुसार सर्व पुष्टी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. बंदी घालण्यात आलेली सर्व अॅप्स ही भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला बाधा आणणारी सामग्री असल्याचे सरकारने म्हटले आहे. (हेही वाचा, Chinese Apps Ban in India: चीनवर भारताचा डिजिटल स्ट्राइक; मोदी सरकारने Free Fire सह 54 चिनी अॅप्सवर घातली बंदी, येथे पहा यादी)

सरकारने केलेली कारवाई ही विविध संस्था, व्यक्ती यांच्या द्वारे मोबाईल अॅप्सद्वारे अल्प अथवा दिर्घ काळासाठी घेतलेल्या कर्जासाठी लोकांकडे खंडणी मगाणे, त्यांचा छळ करणे, अशा विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. हे अॅप्स भारतीयांना कामावर घेऊन त्यांना संचालक बनवणाऱ्या चिनी नागरिकांच्याच विचारांची उपज असल्याचे पुढे येत असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहिती असी की, हे अॅप्स हताश व्यक्तींना कर्ज घेण्याचे आमिष देते. त्यांना कर्जवितरण करते आणि नंतर त्यांचे व्याज वार्षिक 3,000 टक्क्यांपर्यंत वाढवले नेते. कर्जदाराची कर्ज फेडण्याची ऐपत नसताना कर्ज वसूल करण्यासाठी या अॅप्सचे प्रतिनिधी कर्जदाराला प्रचंड मानसिक त्रास देत असत. त्यांच्याकडून खंडणी उकळणे, स्थानिक गुंडांची मदत घेऊन धमकावणे, असेही प्रकार काही प्रकरणांमध्ये पुढे आले आहेत.

धक्कादायक म्हणजे, जे कर्जदार खास करुन महिला कर्जदार जर कर्ज फेडण्यास असमर्थ असतील तर त्यांना अश्लिल फोटो पाठवणे, त्यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियात पोस्ट करण्याची धमकी देणे. त्यांच्याशी संबंधीत लोकांना फोनवरुन शिवीगाळ करणे असे प्रकारही केले जात असत. या अॅप्सच्या प्रतिनिधींच्या छळाला कंटाळून काहींनी आत्महत्या केल्याचीही घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणा, ओडिशा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी या अॅप्सवर कारवाई करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितले होते, असे सूत्रांनी सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now