Pro-Khalistan 6 YouTube Channels Blocked: खलिस्तान समर्थक सामग्री प्रसारित करणाऱ्या 6 यूट्यूब चॅनेलवर केंद्राची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व यूट्यूब चॅनेल खलिस्तान समर्थक सामग्री प्रसारित करत होते, त्यामुळेच त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी याला दुजोरा दिला आहे.

Pro-Khalistan 6 YouTube Channels Blocked: खलिस्तान समर्थक सामग्री प्रसारित करणाऱ्या 6 यूट्यूब चॅनेलवर केंद्राची कारवाई
YouTube (Photo Credits: Getty Image)

मोदी सरकारने पुन्हा एकदा देशविरोधी सामग्री प्रसारित करणाऱ्या 6 यूट्यूब चॅनेलवर ताबा मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व यूट्यूब चॅनेल खलिस्तान समर्थक सामग्री प्रसारित करत होते, त्यामुळेच त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी याला दुजोरा दिला आहे. अपूर्व चंद्रा यांनी शुक्रवारी सांगितले, खलिस्तान समर्थक भावनांना प्रोत्साहन देणारी किमान सहा YouTube चॅनेल सरकारच्या आदेशानुसार ब्लॉक करण्यात आली आहेत.

ते म्हणाले, गेल्या 10 दिवसांत परदेशातून चालवलेले सहा ते आठ YouTube चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत. या वाहिन्या पंजाबी भाषेत असून पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यात संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा Data Broker Breaches: तब्बल 1.8 कोटी पेक्षा जास्त भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती डेटा ब्रोकर उल्लंघनद्वारे झाली उघड

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2023 08:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).