10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे धमाकेदार स्मार्टफोन; दिग्गज कंपन्यांचाही यात समावेश
चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या धडपड सुरुच असते. आपले प्रोडक्ट इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगले आहे, हे युजर्संना पटवून देण्यासाठी कंपन्या वेगवेगळे स्मार्टफोन लाँच करीत आहेत.
भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन कंपन्या दाखल झाल्या आहेत. चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या धडपड सुरुच असते. आपले प्रोडक्ट इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगले आहे, हे युजर्संना पटवून देण्यासाठी कंपन्या वेगवेगळे स्मार्टफोन लाँच करीत आहेत. एवढेच नव्हेतर, युजर्संना कमी किंमतीत बेस्ट स्मार्टफोन देण्यासाठी चढाओढ लागली आहे. यामुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा लागली आहे. याचा सर्वाधिक फायदा युजर्संना होत असल्याचे दिसत आहे. यावर्षी 2020 मध्ये बऱ्याच कंपन्यांनी अनेक स्मार्टफोन लाँच केली आहेत. जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक किंमतीमुळे अनेक स्मार्टफोन चर्चेत राहिले. तर, जाणून घेऊ यावर्षी 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले काही धमाकेदार स्मार्टफोन.
चीनी कंपनी शाओमीने भारतात दाखल झाल्यानंतर स्मार्टफोन बाजारात मोठी खळबळ माजली होती. शाओमी कंपनीच्या स्मार्टफोनची किंमत बाजारातील इतर कंपनीच्या प्रोडक्टच्या तुलनेत अधिक स्वस्त आहेत. महत्वाचे म्हणजे, त्यांच्या स्मार्टफोनची किंमत कमी असून त्यात अधिक फिचर्सचा समावेश केला जात आहे. यामुळे भारतात शाओमी कंपनीने कमी वेळात अधिक प्रसिद्धी मिळवली आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला होता. मात्र, त्यानंतर इतर स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनीही त्यांच्या प्रोडक्टच्या किंमतीत मोठा बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे. हे देखील वाचा- Facebook नंतर आता Instagram वर सुद्धा Messenger Rooms च्या माध्यमातून एकाच वेळी 50 जणांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलता येणार
रियलमी नार्जो 10A-
रियलमीच्या नार्जो 10 ए स्मार्टफोनची विकी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून 22 मे पासून दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम दिला आहे. याफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा प्लस 2 मेगापिक्सलचा प्लस 2 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 5 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत 8 हजार 499 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
मोटो G8 पॉवर लाइट-
मोटो G8 पॉवर लाइट स्मार्टफोन किंमत 8 हजार 999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 5 हजार एमएएच क्षमता असणाऱ्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. तसेच 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला, 2 मेगापिक्सलचा कॅमेरा, तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनची विक्री 29 मे पासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.
रेडमी 8A ड्यूअल-
रेडमी 8A ड्यूअल स्मार्टफोनमध्ये 6.22 चा डिस्प्ले देण्यात येणार आहे. तसेच 5 हजार एमएएचची क्षमता असणारी बॅटरीही देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, यात 13 मेगापिक्सलचा प्लस 2 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनची विक्री सुरु असून स्मार्टफोनला फ्लिपकार्टवरून केवळ 7 हजार 298 रुपयांत खरेदी करु शकतात.
रियलमी C3-
चीनची कंपनी रियलमीने यावर्षी या स्मार्टफोनला फेब्रुवारी महिन्यात लाँच केले होते. या स्मार्टफोनमध्ये 32 जीबी स्टोरेजच्या या स्मार्टफोनची किंमत केवळ 7 हजार 999 रुपये आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा प्लस 2 मेगापिक्सलचा ड्यूअल रियर कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे.