BSNL Network Improvement Process: युजर्सना उत्तम नेटवर्क देण्यासाठी बीएसएनएलने कसली कंबर; स्थापन केले 15,000 टॉवर्स, लवकरच सुरु करणार 4G
बीएसएनएलच्या या 4जी आणि 5जी-रेडी ओटीए प्लॅटफॉर्मचे शुक्रवारी चंदीगडमध्ये उद्घाटन करण्यात आले. तसेच तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे आपत्ती पुनर्प्राप्ती साइटची स्थापना करण्यात आली.
BSNL Network Improvement Process: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची सेवा वापरणाऱ्या युजर्सना लवकरच उत्तम नेटवर्क आणि 4जी कनेक्शन मिळणार आहे. बीएसएनएलबाबत नेहमीच कमकुवत किंवा खराब नेटवर्कची तक्रार होत असते. आता कंपनीने अशा समस्या सोडविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी बीएसएनएलने हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश पश्चिम सर्कलमध्ये 15,000 नेटवर्क टॉवर स्थापित केले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी 80,000 टॉवर बसवले जाणार आहेत. याशिवाय, कंपनीने नवीन 4जी आणि 5जी-रेडी ओव्हर-द-एअर (OTA) आणि युनिव्हर्सल सिम (USIM) प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहेत. सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांतर्गत बीएसएनएलची सेवा आणि कनेक्टिव्हिटी सुधारणे हा त्याचा उद्देश आहे.
बीएसएनएलच्या या 4जी आणि 5जी-रेडी ओटीए प्लॅटफॉर्मचे शुक्रवारी चंदीगडमध्ये उद्घाटन करण्यात आले. तसेच तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे आपत्ती पुनर्प्राप्ती साइटची स्थापना करण्यात आली. या नवीन प्लॅटफॉर्मचा उद्देश बीएसएनएलच्या दूरसंचार सेवा आणि नेटवर्क क्षमता सुधारणे हे आहे, जे देशभरातील वापरकर्त्यांना जलद नेटवर्क गती आणि चांगले कव्हरेज प्रदान करेल. या व्यतिरिक्त हे प्लॅटफॉर्म नंबर पोर्टेबिलिटी आणि सिम बदलण्याची प्रक्रिया देखील सुलभ करते. (हेही वाचा: Major Changes in UPI Payment: कर भरण्यापासून ते व्यवहारापर्यंत, RBI ने युपीआयआमध्ये केले 'हे' दोन मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर)
हे प्लॅटफॉर्म भारतात 4जी आणि 5जी दोन्ही नेटवर्कला सपोर्ट करते. बीएसएनएलनुसार, मार्च 2025 पर्यंत 4जी सेवा पूर्णपणे आणली जाईल आणि 5जी सेवादेखील 6 ते 8 महिन्यांनंतर सुरू करता येईल. अशाप्रकारे बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कची प्रतीक्षा संपली आहे. बीएसएनएलने देशातील 15 हजारांहून अधिक मोबाईल साइट्सवर 4जी टॉवर बसवले आहेत. कंपनी लवकरच संपूर्ण देशात एकाच वेळी 4जी सेवा सुरू करणार आहे. खासगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बीएसएनएलने 5जीची चाचणीही सुरू केली आहे. कंपनी वापरकर्त्यांना 5जी रेडी सिम कार्ड देत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)