Blue Tick Verification Price: आता Facebook-Instagram वर अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी भरावे लागणार शुल्क; जाणून घ्या किंमत

सध्या, मेटा व्हेरिफिकेशन 18 वर्षाखालील व्यक्ती आणि व्यवसायांसाठी उपलब्ध नाही. किमान 18 वर्षे वयाचा कोणताही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्ता त्यांचे खाते सत्यापित करू शकतो.

Facebook, Instagram (Photo Credits: Pixabay and Wikimedia)

एलॉन मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिकच्या व्हेरिफिकेशनसाठी (Blue Tick Verification) किंमत निश्चित केली होती. त्यानंतर सोशल मीडिया कंपनी मेटानेही (Meta) आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामवर (Instagram) ब्लू टिक्ससाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. अहवालानुसार आता मेटाने नुकतेच यूएस मधील मेटा खाती म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्राम खात्यांच्या ब्लू टिक्ससाठी प्रति महिना $ 14.99 शुल्क निश्चित केले आहे. रिपोर्ट्सनुसार, वापरकर्त्यांना मोबाइल डिव्हाइसवरील मेटा प्लॅटफॉर्मवर व्हेरिफिकेशनसाठी दरमहा 1,450 रुपये आणि वेब ब्राउझरद्वारे सदस्यता घेण्यासाठी 1,009 रुपये प्रति महिना द्यावे लागतील.

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन प्रमाणेच, मेटा व्हेरिफाईड तुमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक खात्यांना ब्लू टिक देईल. सध्या, मेटा व्हेरिफाईड बीटा टप्प्यात उपलब्ध आहे आणि वापरकर्त्यांना त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम खाते सत्यापित करण्यासाठी प्रतीक्षा यादीमध्ये सामील व्हावे लागेल. प्रोफाइलवर ब्लू टिक देण्यासोबतच मेटा सत्यापित खात्यांना इतर अनेक फीचर्स आणि सुविधा देणार आहे. यामध्ये सक्रिय संरक्षण (Proactive Protection) थेट ग्राहक समर्थन (Direct Customer Support), विस्तारित पोहोच (Increased Reach) आणि विशेष अतिरिक्त गोष्टींचा समावेश आहे.

सध्या, मेटा व्हेरिफिकेशन 18 वर्षाखालील व्यक्ती आणि व्यवसायांसाठी उपलब्ध नाही. किमान 18 वर्षे वयाचा कोणताही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्ता त्यांचे खाते सत्यापित करू शकतो. सार्वजनिक किंवा खाजगी प्रोफाईल असलेले वापरकर्ते ज्यांची अॅक्टिव्हिटी किमान आहे तेदेखील त्यांचे खाते सत्यापित करू शकतात. यासाठी व्यक्तीला एक सरकारी ओळखपत्र द्यावा लागेल, ज्यामध्ये समान नाव आणि फोटो असेल आणि तो पडताळणी दस्तऐवज म्हणून वापरला जाऊ शकतो. (हेही वाचा: Big Update For Twitter User: ट्विटर पोल्ससाठी केवळ अधिकृत खातीच ठरतील पात्र, एलन मस्क यांची नवी घोषणा; घ्या जाणून)

तुम्हालाही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमच्या खात्याच्या पडताळणीसाठी अर्ज करायचा असल्यास, सर्वप्रथम about.meta.com/technologies/meta-verified या लिंकवर जा. आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर क्लिक करून लॉग इन करा. यानंतर, प्रतीक्षा यादीत सामील होण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, तुमचे खाते सत्यापनासाठी तयार झाल्यानंतर, तुम्हाला एक ईमेल प्राप्त होईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now