WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; दिवाळीनंतर 'या' फोनवर बंद होईल सेवा, जाणून घ्या सविस्तर

iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6s वापरकर्ते अजूनही WhatsApp वापरू शकतात.

WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

जगभरात व्हॉट्सअॅपचे (Whatsapp) दोन अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. एकट्या भारतात त्याचे 500 दशलक्ष वापरकर्ते आहेत. तर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. दिवाळीच्या दरम्यान व्हॉट्सअॅप अनेक यूजर्सना मोठा झटका देणार आहे. कारण यंदा दिवाळीमध्ये काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. 24 ऑक्टोबरपासून हे अॅप अनेक फोनवर काम करणार नाही.

अशा स्थितीत अनेक युजर्सच्या अडचणी वाढू शकतात. रिपोर्ट्सनुसार, दिवाळीच्या दिवशी काही जुन्या iPhones आणि Androids वर WhatsApp सपोर्ट करणे बंद होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 24 ऑक्टोबरपासून जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या iPhones मध्ये WhatsApp वापरता येणार नाही. मात्र, अॅप अपडेट करून ते वापरता येईल. कंपनीने iPhones च्या iOS 10 किंवा iOS 11 ऑपरेटिंग सिस्टमवरील सपोर्ट बंद केला आहे.

यासोबतच iPhone 4 आणि iPhone 4S चे वापरकर्तेदेखील त्यांच्या फोनवर व्हॉट्सअॅपचा वापर करू शकणार नाहीत. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, भविष्यात काही अपडेट्स येणार आहेत, ते ज्या फोनवर काम करणार नाहीत अशा फोनवरील WhatsApp सेवा बंद केल्या जात आहेत. व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी वापरकर्त्याला त्याचा फोन iOS 15 किंवा iOS 16 वर अपडेट करावा लागेल. iPhone 5C आणि iPhone 5 युजर्स फोन अपडेट केल्यावर WhatsApp वापरू शकतील. (हेही वाचा: WhatsApp Features: WhatsApp लवकरच घेऊन येणार 5 नवीन फिचर्स, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)

भलेही काही iPhones वर WhatsApp चालणार नसले तरी, ते इतर जुन्या iPhones वर वापरले जाऊ शकते. iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6s वापरकर्ते अजूनही WhatsApp वापरू शकतात. मात्र यासाठी वापरकर्त्यांना त्यांचे डिव्हाइस फक्त iOS 15 किंवा iOS 16 ते iOS व्हर्जनवर अपडेट करावे लागेल. Android डिव्हाइस वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनवर WhatsApp सुरू ठेवण्यासाठी Android 4.1 किंवा त्याच्या पुढचे व्हर्जन गरजेचे आहे.