भारतात चिनी गुंतवणूक असलेल्या Big Basket च्या दोन कोटी ग्राहकांचा खासगी डेटा लीक

Photo Credits: bigbasket official site

भारतात चिनी गुंतवणूक असलेले ऑनलाईन ग्रोसरी प्लॅटफॉर्म बिग बास्केट (Big Basket) वर सायबर हल्ला करण्यात आल्याची गोष्ट समोर आली आहे. खंरतर बिग बास्केटच्या तब्बल दोन कोटी लोकांचा खासगी डेटा लीक झाला असून तो डार्क बेववर विक्री केला जात असल्याचे ही उघडकीस आले आहे. अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी इंटेलिजेंस फर्म सायबल इंक यांनी ही माहिती दिली आहे. सायबल ब्लॉग पोस्ट नुसार, जो डेटा लीक झाला आहे त्यामध्ये ग्राहकांचे नाव, ईमेल आयडी, पासवर्ड, पिन, कॉन्टॅक्ट क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, आयपी अॅड्रेस आणि लोकेशन सारखी माहितीचा त्यामध्ये समावेश आहे.

बंगळुरु मधील बिग बास्केटने या संबंधित शहरातील सायबर क्राइम सेल मध्ये सुद्धा तक्रार दाखल केली आहे. सध्या कंपनी डेटा लीक झाल्याचा दाव्याचा तपास आणि विश्लेषणासंदर्भात अधिक शोध घेत आहेत. कंपनीने एका विधानात असे म्हटले की,आमच्या ग्राहकांची गोपनियता आणि खासगी माहिती सुरक्षित ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही ग्राहकांचा Financial डेटा स्टोर करत नाही. ज्यामध्ये क्रेडिट कार्ड संबंधित अधिक माहितीचा समावेश असतो. आम्हाला विश्वास आहे की, ग्राहकांची ही माहिती सुरक्षित आहे.

सायबल ब्लॉग पोस्टच्या मते बिग बास्केटच्या ग्राहकांचा डेचा 14 ऑक्टोंबरला चोरी करण्यात आला. त्यामुळे कंपनीच्या मॅनेजमेंटला 1 नोव्हेंबर रोजी सुचना देण्यात आल्या. तर डार्क बेववर ग्राहकांचा हा डेटा 40 हजार डॉलर्स मध्ये विक्री केला जात आहे.(सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी, व्यवहार करताना Bank Frauds चा धोका; या 6 बॅंकिंग आर्थिक फसवणूकीच्या मार्गांबाबत दक्ष रहा!)

IBM च्या रिपोर्टनुसार, डेटा लीक होण्याची तीन मुख्य कारणे असतात. पहिले म्हणजे मानवीय चुका, ज्यामध्ये ग्राहक आपली चुकांमुळे किंवा बेजबाबदारपणामुळे हॅकर्सच्या तावडीत सापडतात. दुसरे कारण असे की, सिस्टिम मध्ये कमकुवता असणे. त्यामुळे डेटा लीक होण्याची शक्यता असते. तिसरे आणि शेवटचे कारण म्हणजे हॅकर्सकडून करण्यात येणारा सायबर हल्ला. डेटा लीकची बहुतांश प्रकरणे ही सायबर अटॅकमुळेच घडली जातात.

दरम्यान, बिग बास्केटमध्ये चिनची कंपनी अलीबाबा, मिराय एसेट नेवर, एशिया ग्रोथ फंड आणि ब्रिटीश सरकारच्या CDC ग्रुपची सुद्धा गुंतवणूक आहे. नुकत्याच बिग बास्केटमध्ये अन्य काही गुंतवणूकदारांसोबत फडिंग बद्दल बातचीत सुरु आहे. बिग बास्केट 350-400 मिलियन डॉलरची रक्कम एकजुट करण्याचा पाठी लागली आहे. यासाठी कंपनी सिंगापूर सरकारच्या टीमासेक, अमेरिका बेस्ड फिडेलिटी आणि टाइबोर्न कॅपिटलसोबत फंडिंग बद्दल चर्चा करत आहे.