BGMI: मोबाईलवर बीजीएमआय खेळता? केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता; घ्या जाणून
केंद्र सरकार आगामी काळात या खेळावर बंदी (BGMI Ban In India) घालण्याची शक्यता आहे.
तुम्ही जर बेटलग्राऊंड मोबाईल इंडिया (Battlegrounds Mobile India) अर्थातच बीजीएमआय (BGMI) हा खेळ (गेम) मोबाईलवर खेळत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकार आगामी काळात या खेळावर बंदी (BGMI Ban In India) घालण्याची शक्यता आहे. भारतातील अनेक तरुण आणि मुलांच्या आयुष्याचा अंत करणाऱ्या पबजी गेमवर सरकारने बंदी घातली. त्यानंतर आता बीजीएमआय हा देखील बंदीच्या मार्गाने वाटचार करत असल्याचे सूत्रांचे म्हणने आहे. क्रॉफ्टनचा लेकप्रीय बॅटल रॉयल गेम असलेला बीजीएमआय खेळल्याने अनेक वापरकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा डेटा मोठ्या प्रमाणावर गोळा केला जातो. या डेटाचा वापर करुन राष्ट्रविगात कृती आणि सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याची भीती भारतीय अधिकारी आणि सरकारला वाटते. परिणामी या खेळावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते.
सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
भारताच्या सायबर सुरक्षा विभागात काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याने न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी माहिती मिळविण्याचे काम करणाऱ्या सरकारच्या एका संस्थेने बीजीएमआय हे अॅप गेमच्या नावाखाली डेटा गोळा करते. त्यांच्याकडे जमा होणाऱ्या महाकाय डेटामुळे आगामी काळात भारतावर सायबर सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण होऊ शकते. ज्यातून सायबर हल्ल्याची आणि राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी समस्या जन्माला येऊ शकते. त्यामुळे या अॅपवर वेळीच बंदी घालणे आवश्यक आहे. अर्थात, या वृत्तात अधिकाऱ्याने नेमक्या कारणांचा उल्लेख केला नाही. मात्र, सांगितले जात आहे की, अलिकडेच सोशल मीडिया आणि गेमच्या माध्यमातून झालेली ओळख आणि त्यातून पाकिस्तानातील महिला सीमा हैदर हिने भारतात केलेला प्रवेश त्यासोबत इतरही काही कारणे गेमवर बंदी घालण्यामागे असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा,Battlegrounds Mobile India गेम खेळण्यासाठी 'या' मोबाईल स्पेसिफिकेशन्सची गरज; जाणून घ्या सविस्तर )
सायबर हल्ल्याचा धोका
बीजीएमआय हा गेम यूएसस्थीत कंपनीद्वारे निर्मित आहे. भारतीय एजन्सींजना या गेमद्वारे गोळा केला जाणारा नागरिकांचा डेटा हा चिंतेचा विषय आहे. हा डेटा इतरत्र हस्तांतरीत केला जाणार नाही किंवा त्याचा आधार घेऊन नागरिकांची गोपनीय माहिती जमा केली जाणार नाही, याची कोणतीही खात्री दिली जात नाही. परिणामी आगामी काळात नागरिकांना आणि सरकारलाही सुरक्षेच्या मुद्द्यावरुन वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागू शकते, असे अधिकाऱ्यांना वाटते. त्यामुळे अशा प्रकारचे गेम्सना भारतात प्रवेश देणे म्हणजे सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रकारही काही अधिकाऱ्यांना वाटतो. (हेही वाचा, BGMI To Resume In India: BGMI चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम वर्षभराच्या बंदीनंतर भारतात पुन्हा होणार लॉन्च)
दरम्यान, गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, केद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला केंद्रीय गुप्तचरांनी कळवले आहे की, अशा प्रकारचे गेम्स वापरर्त्याचा प्रोफाईल डेटा जमा करत आहेत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामग्री देशाबाहेरील लोकांच्या हाती लागत आहे. त्यावर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास आगामी काळात साबर हल्ल्याचा धोका पाहायला मिळू शकतो. या अॅपमध्ये अनेक त्रुटी आहेत. पण सर्वात मोठी समस्या अशी की, त्याचे अनेक सर्व्हर चीनसोबत कनेक्ट असल्याचे पुढे आले आहे. ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.