BGMI गेम निर्माता KRAFTON करणार भारतात गुंतवणूक
कंपनीने मार्च 2021 मध्ये पहिली गुंतवणूक केली.
BGMI गेम निर्माता कंपनी पुढच्या दोन ते तीन वर्षांमध्ये भारतामध्ये सुमारे 150 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. कपंनीने याबाबत गुरुवारी (10 ऑगस्ट) माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की, कंटेंट-आधारित प्लॅटफॉर्म आणि सखोल तंत्रज्ञानावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्यांतर्गत देशातील गेमिंग आणि स्टार्टअप इकोसिस्टममध्ये गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारताच्या क्षमतेवर आमचा प्रचंड विश्वास आहे. आगामी काळात भारत हा जागतिक गेमिंग आणि तंत्रज्ञान उद्योगातील प्रमुख खेळाडू असेल, असे कोतुकोद्गारही कंपनीचे सीईओ शॉन ह्युनिल सोहन यांनी काढले आहेत.
सीईओ शॉन ह्युनिल सोहन यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही भारतीय आयपीच्या सामर्थ्यावर आणि जागतिक पातळीवर शाश्वत प्रभाव टाकण्याचा विचार करतो आहोत. कंपनीने मार्च 2021 मध्ये पहिली गुंतवणूक केली. त्यावेळी नाविन्यपूर्ण 11 स्टार्टअप्समध्ये सुमारे 140 दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक झाली आहे. गेम डेव्हलपमेंट स्टुडिओच्याही पलीकडे जाऊन कंपनीची गुंतवणूक विविध आणि पूरक क्षेत्रांमध्ये पसरते आहे. ज्यात एस्पोर्ट्स, मल्टीमीडिया मनोरंजन, सामग्री निर्मिती आणि ऑडिओ प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Indian Web Browser: गुगल क्रोमशी स्पर्धा करण्यासाठी भारत सरकार लॉन्च करणार 'स्वदेशी’ वेब ब्राउझर, जाणून घ्या सविस्तर)
ट्विट
आम्ही भारतातील विविध विभागांमध्ये एक गतिमान आणि विकसित पोर्टफोलिओ स्थापन करण्याचा प्रयत्न करत असताना आमची गुंतवणुकीची गती कायम राहील," असे कॉर्पोरेट विकास आणि उपक्रम गुंतवणूक प्रमुख निहांश भट यांनी म्हटले आहे. BGMI व्यतिरिक्त, कंपनीने देशात कॅलिस्टो प्रोटोकॉल, रोड टू व्हॅलर: एम्पायर्स आणि डिफेन्स डर्बी गेम्स लॉन्च केले आहेत. Krafton Inc ही एक दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम होल्डिंग कंपनी आहे. मार्च 2007 मध्ये सोलमध्ये Chang-Byung-gyu यांनी ही कंपनी स्थापन केली.