15,000 रूपयाच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत हे दमदार 4 G स्मार्टफोन
हे आहेत बजेट स्मार्टफोन
विज्ञान, तंत्रज्ञानात आता जसजसे बदल होत चालले आहेत तसे अपडेटेड स्मार्टफोन बनवले जात आहेत. सध्या सर्वत्र 4जीची धूम आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या त्यासाठी बाजारात नवनवे प्लॅन्स आणत आहेत. मग तुम्हीही नव्या 4जी स्मार्टफोनच्या विचारत आहात ? मग सुमारे पंधरा हजाराच्या बजेटमधील या आघाडीच्या स्मार्टफोन्सचा नक्की विचार करा.
बाजारात कोणते 4जी स्मार्टफोन उपलब्ध आहेत ?
Coolpad Cool Play 6
Coolpad Cool Play 6 हा मोबाईल मे 2017मध्ये बाजारात आला. या फोनचा डिस्प्ले 5.5 इंच, रिझोल्युशन 1080 x 1920 पिक्सल आहे. 1.95 GHz Octa core Qualcomm Snapdragon 653 हा प्रोसेसर असून 6जीबी रॅम आहे.
किंमत : अमेझॉनवर हा मोबाईल सुमारे 14,900 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.
Lenovo K8 Note
Lenovo K8 Note मागील वर्षी लॉन्च झाला आहे. या फोनचा डिस्प्ले 5.5 इंच, रिझोल्युशन 1080 x 1920 पिक्सल आहे. 2.3 GHz Deca core Mediatek Helio X23 प्रोसेसवर चालणार्या या मोबाईलमध्ये 3 जीबी रॅम आहे.
किंमत : पेटीएमवर 9990 तर अमेझॉनवर 8999 रूपयांत खरेदी करू शकाल.
Xiaomi Mi Max 2
Xiaomi Mi Max 2 हा फोनदेखील मागीलवर्षी जुलै महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. 6.44 इंच डिस्प्ले, 1080 x 1920 पिक्सलचा हा स्मार्टफोन 2 GHz Octa core Qualcomm Snapdragon 625 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅमवर उपलब्ध आहे.
किंमत : अमेझॉनवर हा मोबाईल 13,999 रूपयांत खरेदी करू शकाल.
Nubia N1
Nubia N1 हा फोन 5.5 इंच डिस्प्ले, रिझोल्युशन 1080 x 1920
पिक्सल आहे. 2GHz Octa core Mediatek MT6755 Helio P10 हा प्रोसेसर असून 3 जीबी रॅम आहे.
किंमत : अमेझॉनवर हा मोबाईल सुमारे 11,999 रूपयांत खरेदी करू शकाल.
Xiaomi Mi A1
Xiaomi Mi A1हा फोन 5.5 इंच डिस्प्ले, रिझोल्युशन 1080 x 1920 पिक्सल आहे.हा स्मार्ट फोन 2 GHz Octa core Qualcomm Snapdragon 625 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅमवर उपलब्ध आहे.
किंमत : अमेझॉनवर हा मोबाईल सुमारे 11,999 रूपयांत खरेदी करू शकाल.