Battlegrounds Mobile India गेम 18 जून रोजी लॉन्च होण्याची शक्यता; पहा नवा Teaser
कंपनीने नुकताच त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर गेमचा नवा टीझर लॉन्च केला असून या टीझरद्वारे लोकांना लॉन्च डेट ओळखण्यास सांगितले आहे.
पबजी इंडिया (PUBG India) गेम बॅन झाल्यानंतर त्याऐवजी Battlegrounds Mobile India हा गेम लॉन्च होणार असल्याचे समजल्यापासून भारतातील चाहते या गेमचे आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून Krafton कडून या मोबाईल गेमची टेस्टिंग सुरु आहे. कंपनीने नुकताच त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर गेमचा नवा टीझर (Teaser) लॉन्च केला असून या टीझरद्वारे लोकांना लॉन्च डेट (Launch Date) ओळखण्यास सांगितले आहे. या टीझर इमेजमध्ये ग्राफ आणि काही नंबर्स आहेत. या नंबर्सचे कॉम्बिनेशन केले असता '18' हा आकडा समोर येतो. त्यामुळे या महिन्याच्या 18 तारखेला गेम लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Battlegrounds Mobile India ने या गेममध्ये पजबी मोबाईल मधील UAZ vehicle आणि Erangel Map असल्याची शाश्वती दिली आहे. परंतु, या मॅपला 'Erangle' असे ओळखले जाईल. (Battlegrounds Mobile India साठी रजिस्ट्रेशन कसे कराल? जाणून घ्या स्टेप्स)
पहा टीझर:
या गेममध्ये वेगवेगळ्या inventory आणि आऊटफिट्स दिसून येतील. परंतु, हे सर्व पबजी मोबाईल गेम प्रमाणे असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पबजी मोबाईल सारखे लेव्हल 3 चे बॅगपॅक Krafton ने रिलीज केलेल्या टीझरमध्ये दिसून आले.
गुगल प्ले स्टोअरवर हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सॉफ्टवेअरची गरज असेल. गेम खेळण्यासाठी अनरॉईड 5 पेक्षा अधिक स्मार्टफोनची आवश्यकता आहे. तसंच तुमच्या स्मार्टफोनमध्ये कमीत कमी 2 जीबी रॅम असणे गरजेचे आहे आणि एक स्टेबल इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. ज्या युजर्सने या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केले आहे, अशा युजर्संना रेकॉन मास्क, रेकॉन आऊटफिट आणि सेलिब्रेशन एक्स्पर्ट टायटल मिळणार आहे.