VLC Player Unbanned in India: व्हीएलसी मीडिया प्लेयरवरील भारतातील बंदी हटवली; वापरकर्त्यांना डाउनलोड करण्याचा पर्याय पुन्हा उपलब्ध
भारतातील बंदीनंतर कंपनीला कायदेशीर मदत दिल्याचा IFFचा दावा आहे. आता वापरकर्ते VideoLan च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन VLC Media Player ची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करू शकतात.
VLC Player Unbanned in India: लोकप्रिय व्हीएलसी मीडिया प्लेयर सॉफ्टवेअरवर (VCL Media Player) भारत सरकारने घातलेली बंदी हटवण्यात आली असून ते डाउनलोड करण्याचा पर्याय वापरकर्त्यांना पुन्हा एकदा उपलब्ध झाला आहे. या मल्टीमीडिया प्लेयरवर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बंदी घातली होती. इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनने (IFF) म्हटले आहे की, ही बंदी आता उठवण्यात आली आहे.
भारतातील बंदीनंतर कंपनीला कायदेशीर मदत दिल्याचा IFFचा दावा आहे. आता वापरकर्ते VideoLan च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन VLC Media Player ची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करू शकतात. ही वेबसाइट काही दिवसांपूर्वी ब्लॉक केली गेली होती. वापरकर्ते त्यांच्या डिव्हाइसवर नवीन मीडिया प्लेयर इंस्टॉल करण्यास सक्षम नव्हते. (हेही वाचा - Twitter मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात; 4400 कंत्राटी कामगारांना नोटीस न देता कामावरून काढले, Elon Musk यांनी दिला मोठा धक्का)
सरकारने लादलेल्या बंदीनंतर, वापरकर्ते व्हिडिओलॅनच्या वेबसाइटवर प्रवेश करू शकले नाहीत. वेबसाइटला भेट दिल्यावर, वापरकर्त्यांना एक नोटीस दाखवली जात होती. ज्यामध्ये लिहिले होते, 'वेबसाइट इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने IT कायदा, 2000 अंतर्गत ब्लॉक केली आहे'. सरकारने या बंदीशी संबंधित कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही किंवा तसे करण्यामागची कारणेही दिली नाहीत.
कंपनीने मंत्रालयाला पाठवली होती कायदेशीर नोटीस -
ऑक्टोबरमध्ये, व्हिडिओलॅनद्वारे मंत्रालयाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यामध्ये बंदी घालण्याचे कारण विचारण्यात आले होते. ही बंदी लादण्यामागचे संपूर्ण कारण सरकारने न दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. कोणतेही ठोस कारण नसताना सरकारने या मीडिया प्लेयरवर बंदी घातली असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, 2021 मध्ये प्रथम रिलीज झालेला, VLC Media Player हे VideoLAN प्रोजेक्टद्वारे विकसित केलेले विनामूल्य आणि मुक्त-स्रोत क्रॉस-प्लॅटफॉर्म मीडिया प्लेयर सॉफ्टवेअर आणि स्ट्रीमिंग मीडिया सर्व्हर आहे. त्याच्या मदतीने व्हिडिओ फॉरमॅट्सही बदलता येतात. तथापि, या वर्षाच्या सुरुवातीला चीनी हॅकर्स व्हीएलसी मीडिया प्लेयरच्या मदतीने वापरकर्त्यांची हेरगिरी करत असल्याचा आरोप करण्यात आला आणि वापरकर्त्यांना चेतावणी देण्यात आली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)