Child Porn, XXX Clips आणि Fake News वर बॅन; Whatsapp आणि Facebook होऊ शकते बंद

नव्या नियमांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर सरकार अशा प्रकारे फेक न्यूज आणि चाइल्ड पोर्नोग्राफीला बढावा देणाऱ्या वेबसाईट आणि अॅप्स बॅन करू शकते.

सोशल मिडिया (Photo Credits: Pixabay)

फेक न्यूज (Fake News) आणि चाइल्ड पोर्नोग्राफी (Child Pornography)ला लगाम घालण्यासाठी, सरकारने आयटी अॅक्ट (IT Act)मध्ये काही बदल करण्याची सूचना केली आहे. जर का या नव्या नियमांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर सरकार अशा प्रकारे फेक न्यूज आणि चाइल्ड पोर्नोग्राफीला बढावा देणाऱ्या वेबसाईट आणि अॅप्स बॅन करू शकते. मात्र सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा झटका व्हॉट्सअॅप (Whatsapp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), यूसी वेब (UC Web), टेलीग्राम (Telegram) आणि गूगल (Google) सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या युजर्सला बसू शकतो.

गेल्या काही वर्षांपासून ‘फेक न्यूज’मुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहचत आहे. सरकार आणि जनता यांमधील संबंधांवरही या गोष्टीचा परिणाम होत आहे. त्यामुळे या गोष्टीचा समूळ नाश करण्यासाठी सरकार आता काही ठोस पावले उचलत आहे. याद्वारे नवे सुधारीत नियम लागू झाल्यास फेक न्यूज आणि चाइल्ड पोर्नोग्राफी असणाऱ्या सर्व वेबसाईट आणि अॅप्स पूर्णपणे बंद होतील. याचसोबत सरकारी नियमांचे उल्लंघन केल्यास 15 करोड रुपये अथवा, वर्ल्डवाइड टर्नओव्हरचा चौथा हिस्सा दंड म्हणून आकाराला जाईल. (हेही वाचा : Pornhub ला भेट देणाऱ्यांमध्ये भारताचा तिसरा नंबर; यात 30 टक्के महिलांचा समावेश)

सायबर कायदा तज्ज्ञ पुनीत भसीन यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘सध्या आयटी अॅक्टच्या अंतर्गत जे नियम आहेत, त्यांद्वारे फेक न्यूज आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीवर पूर्णतः नियंत्रण ठेवता येत नाही. यासाठी काही कडक कायदे नव्याने तयार करणे अथवा आहे त्या कायद्यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे.’ सरकारचे हे नवे नियम व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मदेखील लागू होतील.