भारतात TikTok बंद होण्याची शक्यात, मद्रास उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

या App च्या माध्यमातून युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवतात आणि ते शेअरही करु शकतात. भारताही TikTok APP प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या अॅपच्या माध्यमातून बॉलिवुडच्या संवांदांपासून ते विनोद आणि डान्सचे अनेक व्हिडिओ सहजपणे बनवता येतात.

TikTok | (Photo credit: archived, edited, representative image)

प्रदीर्घ काळापासून अनेकांच्या स्मार्टफोन (Smartphone) आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या TikTok व्हिडिओंना चाप लागण्याची शक्यता आहे. कारण, मद्रास उच्च न्यायालयाने(Madras High Court) TikTok या अॅपवर बंदी घालावी असे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सरकारने निर्णय घेतला तर, देशात TikTok या अॅपवर बंदी येऊ शकते. TikTok Appने तरुणाई आणि लहान थोरांपासूनते थेट जेष्ठ नागरिक आणि वृद्धांमध्येही क्रेझ निर्माण केली आहे.

TikTok अॅपवर आक्षेप घेणारी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, जी लहान मुलं TikTok अॅप वापरतात अशी मुलं लैंगिक गुन्हे करणाऱ्या लोकांच्या संपर्कात सहजपणे येऊ शकतात. या अॅपच्या माध्यमातून आक्षेपार्ह सामग्री (कंटेंट) प्रसारीत होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत, या अॅपवर बंदी घालावी असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

TikTok App बीजिंग येथील एका कंपनीने बनवले आहे. या App च्या माध्यमातून युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवतात आणि ते शेअरही करु शकतात. भारताही TikTok APP प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या अॅपच्या माध्यमातून बॉलिवुडच्या संवांदांपासून ते विनोद आणि डान्सचे अनेक व्हिडिओ सहजपणे बनवता येतात. इतकेच नव्हे तर लिप सिंक माध्यमातून लोकप्रिय गाणी स्वत: गायली आहेत असेही भासवता येते. (हेही वाचा, फेसबुक डेटा लीक सत्र सुरूच; कोट्यवधी युजर्सची माहिती अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक)

तामिळनाडू राज्याच्या आयटी मंत्र्यांनी फेब्रुवारी (2019) मध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, TikTok अॅपच्या माध्यमातून प्रसारीत, शेअर केलेला बराचसा कंटेट हा अत्यंत आक्षेपार्ह असतो. अनेक राजकीय पक्षांनीही TikTok बंद करावे असे म्हटले आहे.