गेमिंगसाठी Asus ROG Phone 2 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Asus ROG Phone 2 हा स्मार्टफोन खास गेमिंग युजर्ससाठी भारतात लॉन्च करण्यात आला आहे. असुस कंपनीचा हा स्मार्टफोन Snapdragon 855+ वर आधारित असून त्यामध्ये 12 GB चा LPDDR4X रॅम देण्यात आला आहे. त्यामुळे गेमिंग युजर्सला कोणताही गेम खेळताना कोणताही अडथळा येणार नाही आहे.
Asus ROG Phone 2 हा स्मार्टफोन खास गेमिंग युजर्ससाठी भारतात लॉन्च करण्यात आला आहे. असुस कंपनीचा हा स्मार्टफोन Snapdragon 855+ वर आधारित असून त्यामध्ये 12 GB चा LPDDR4X रॅम देण्यात आला आहे. त्यामुळे गेमिंग युजर्सला कोणताही गेम खेळताना कोणताही अडथळा येणार नाही आहे. तसेच गेमिंगला अधिक उत्तम दर्जा देण्यासाठी DTS सह स्टीरिओ सपोर्ट आणि X Ultra सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनसह काही ROG Phone 30 W charger, Mobile Desktop Dock आणि ROG Kunai Gamepad controller सारख्या एक्ससरिज सुद्धा लॉन्च केल्या आहेत.
Asus ROG Phone 2 दोन स्टोरेजच्या वेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्यामध्ये 8GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या वेरियंटची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 126GB रॅम + 512GB स्टोरेज असणाऱ्या वेरियंटसाठी ग्राहकांना 59,999 रुपये मोजावे लागणार आहेत. असुस कंपनीचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 30 सप्टेंबर पासून ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
असुस रॉग फोन 2 मध्ये 120Hz refresh rate सोबत 6.59 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तर स्क्रिन रेजोल्युशन 1080 x 2340 पिक्सल आहे. या फोनसाठी 10-bit HDR सपोर्ट देण्यात आला आहे. स्क्रिनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्साल 6 दिली असून स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 855+ चिपसेटवर काम करतो.(Amazon Great Indian Festival: अॅमेझॉनच्या या बंपर सेल मध्ये गॅजेट्ससह अन्य वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट, 29 ते 4 सप्टेंबर पर्यंत असणार हा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल')
फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास Asus ROG Phone 2 मध्ये ड्युअर रियर कॅमेरा दिला आहे. त्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 13 मेगापिक्सलचा वाइड अॅन्गल कॅमरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी यामध्ये Quick Charge 4.0 फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत 6,000एमएएच बॅटरी सुद्धा दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)