Apple चा स्वस्त iPad लवकरचं भारतात लाँच होणार; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Apple चा नवीन 8th जनरेशन आयपॅड 10.9 इंचाच्या लिक्विड डिस्प्लेसह येईल. त्याचे रिझोल्यूशन 2360/1640 पिक्सेल असेल. हा टॅब आयपॅड ओएसवर चालेल. यात आश्चर्यकारक गेमिंगचा अनुभव घेता येईल.
प्रीमियम स्मार्टफोन निर्माता अॅपल लवकरचं भारतात एक नवीन आयपॅड बाजारात आणणार आहे. हा 9 जनरेशन आयपॅड असेल. जो वजनाने अगदी हलका आणि बारीक असेल. हा आगामी Apple आयपॅड परवडणार्या किंमतीत उपलब्ध असेल. Mac Otakara अहवालानुसार, आगामी आयपॅड एक स्वेल्ट बॉडीमध्ये येईल. हा iPad Air 3 सारखा असेल. ज्याच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसेल. (Realme X50 Pro 5G स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घट; जाणून नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)
संभाव्य किंमत -
नवीन आयपॅडची किंमत $ 299 च्या सुरूवातीच्या किंमतीवर लाँच केला जाऊ शकते. सध्या आयपॅड एअरची किंमत 329 डॉलर आहे. हा 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह लॉन्च केला जाऊ शकतो, जो सध्या 32 जीबी स्टोरेज पर्यायामध्ये येतो. 2021 आयपॅड लाइन अप मार्चच्या शेवटी अॅपलद्वारे सादर केला जाऊ शकतो. तथापि, कंपनीच्या वतीने नवीन आयपॅडबद्दल कोणतीही माहिती अधिकृतपणे शेअर करण्यात आलेली नाही.
स्पेसिफिकेशन्स -
आगामी आयपॅडचा डिस्प्ले 10.2 इंचाचा असेल. परंतु, हा आयपॅड Air 3 पेक्षा किंचित पातळ असेल. आयपॅड एअर 6.3 मिमी पातळ आहे. नवीन आयपॅड 460 ग्रॅम म्हणजेच वर्तमान आयपॅडपेक्षा 30 ग्रॅमने कमी असेल. आयपॅड एअरचे वजन 290 ग्रॅम आहे. या डिव्हाइसमध्ये टच आयडी होम होम बटन आहे, जे लाइटिंग पोर्ट सपोर्टसह येईल. हा आयपॅड अँटी-रिफ्लेक्टीव्ह कोटिंग, पी 3 वाइड कलर सपोर्ट आणि दोन टोनसह येईल.
8th जनरेशन Apple iPad -
Apple चा नवीन 8th जनरेशन आयपॅड 10.9 इंचाच्या लिक्विड डिस्प्लेसह येईल. त्याचे रिझोल्यूशन 2360/1640 पिक्सेल असेल. हा टॅब आयपॅड ओएसवर चालेल. यात आश्चर्यकारक गेमिंगचा अनुभव घेता येईल. हा आयपॅड ऑल डे बॅटरी लाइफसह येईल. अॅपलचा दावा आहे की, हा सर्वात चिपसेट आयपॅड असेल.
कॅमेरा आणि बॅटरी -
आयपॅड एअर टॅबच्या मागील पॅनेलवर एक 12 एमपी कॅमेरा उपलब्ध असेल, जो व्हिडिओ स्टॅबिलाइजेशन फीचरसह येईल. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी फ्रंटमध्ये 7 एमपी चे फेस टाइम एचडी कॅमेरा आहे. जो प्रति सेकंद 60 फ्रेमवर एचडीआर आणि 1080 पिक्सेल कॅप्चर करण्यास सक्षम असेल. कनेक्टिव्हिटीसाठी, आयपॅड एअरमध्ये एक यूएसबी-सी प्रकार आहे, जो 20 डब्ल्यू चार्जिंगला समर्थन देईल. हे 5 जीबीपीएस डेटा हस्तांतरित करण्यास देखील सक्षम असेल. टॅब Wi-Fi 6 कनेक्टिव्हिटीसह येईल. टॅबच्या उर्जा बटणावर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)