BMW कंपनीच्या एक्स 5 कारपेक्षा महाग मिळतो ऍपलचा Mac Pro Desktop Computer, किंमत पाहून बसेल धक्का!

परंतु, या वाहनांची किंमत अधिक असल्याने प्रत्येकाला बीएमडब्ल्यू खरेदी करणे शक्य होत नाही. लवकरच बाजारात ऍपल कंपनीचा मॅक प्रो डेस्कटॉप संगणक (Apple Mac Pro Desktop Computer) बाजारात दाखल होणार असून याची किंमत बीएमडब्ल्यू एक्स 5 (New BMW X5) कारपेक्षा अधिक महाग असल्याची माहिती समोर आली आहे.

Apple (Photo Credits: IANS)

अनेकांना बीएमडब्ल्यू कंपनीची कार खरेदी करण्याची इच्छा आहे. परंतु, या वाहनांची किंमत अधिक असल्याने प्रत्येकाला बीएमडब्ल्यू खरेदी करणे शक्य होत नाही. लवकरच बाजारात ऍपल कंपनीचा मॅक प्रो डेस्कटॉप संगणक (Apple Mac Pro Desktop Computer) बाजारात दाखल होणार असून याची किंमत बीएमडब्ल्यू एक्स 5 (New BMW X5) कारपेक्षा अधिक महाग असल्याची माहिती समोर आली आहे. जून महिन्यात ऍपलच्या कंपनीने मॅक प्रो डेक्सटॉप (Mac Pro) संगणकाची घोषणा केली होती. नवा मॅक प्रो आणि प्रो डिस्प्ले एक्सडीआर (Pro Display XDR) प्री-ऑर्डरसाठी केवळ अमेरिकेत उपलब्ध आहे. नव्या मॅक प्रो संगणकाची सुरुवाती किंमत 5 हजार 999 डॉलर्स आहे. तर प्रो डिस्प्ले एक्सडीआर संगणकाची किंमत 4 हजार 999 डॉलर्सपासून सुरु आहे. जर तुम्हाला यातील सर्वात लेटेस्ट आणि टॉप आवृत्तीच्या संगणकाची खरेदी करायची असेल तर, यासाठी 50 हजार 199 डॉलर्स मोजावे लागणार आहे.

ऍपल मॅक प्रो डेस्कटॉप संगणकात 28-core Intel Xeon processors, 1.5TB पर्यंत ECC RAM, AMD Radeon Pro Vega II DuO ग्राफिक्ससोबत 4TB पर्यंत SSD स्टोरेज आणि 64GB चे HBM2 मेमरी इत्यादी उपलब्ध आहे. क्वार्ट्जने दिलेल्या माहितीनुसार, बीएमडब्ल्यू 3 सीरीज की किंमत 40 हजार 750 डॉलर्स इतकी आहे. आप प्रो डिस्प्ले एक्सडीआरसह संगणक स्टॅंड हवे असल्यास 50 हजार 199 डॉलर देऊन तुम्हाला 6 हजार 998 डॉलर अधिक द्यावे लागणार आहे. ऐवढ्या किंमतीत तुम्ही बीएमडब्ल्यू कार खरेदी करु शकता. कंपनीने पहल्यांदा डेव्हलपर्स कॉन्फ्रन्स दरम्यान जून महिन्यात नवीन मॅक प्रो डिस्प्ले एक्सडीआर की घोषणा केली होती. 32 जीबी मेमरी, ऑक्टा- कोर इंटेल Xeon CPU, Radeon Pro 580X ग्राफिक्स आणि 256GB SSD सह एन्ट्री-लेव्हल मॅक प्रो की कीमत 5,999 डॉलर आहे. हे देखील वाचा-Flipkart वरुन iPhone 11 Pro खरेदी करणे पडले महागात, ग्राहकाला डिलिव्हरी ऑर्डरमध्ये मिळाला नकली आयफोन

माहितीनुसार, मॅक प्रो ऍपलची ही सर्वाधिक शक्तीशाली मशीन असणार आहे आणि मूळ मॅकपेक्षा 15 हजार पट्टीने वेगवान आहे. ऍपल आणि त्याच्या उत्पादक भागीदारांनी ऑस्टिनमध्ये 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, मॅक असेंब्ली लाइन तयार केली आणि मॅकचे उत्पादन केले.