IPL Auction 2025 Live

अॅपलचे तब्बल तीन नवीन फोन लाँच, फीचर्स पाहिलेत तर तुम्हीही पडाल प्रेमात

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या उत्पादनामधील सर्वाधीक लोकप्रिय कंपनी ‘अॅपल’ने, आयफोन X च्या प्रचंड यशानंतर बुधवारी आयफोन Xs, आयफोन Xs Max आणि आयफोन Xr असे तीन मोबाईल लाँच केले. कॅलिफोर्नियातील अ‍ॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स सभागृहामध्ये या नवीन आयफोनचे अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. अॅपलकडून एकाच वेळी तीन आयफोनसह मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड लाँच करण्यात आले. iPhone Xs आणि iPhone Xs Max हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

आधीच्या फोन्सपेक्षा अनेक नवीन फीचर्स या नवीन फोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या आयफोन्सची किंमत जवळपास ७४ हजारांच्या घरात असेल. फेस आयडी हे तिन्ही मोबाइलचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तसेच विशेष म्हणजे या फोनमध्ये ड्युअल सिमची सुविधा देण्यात येणार आहे. Phone Xs आणि iPhone Xs Max ला ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच दोन्ही आयफोनला ड्युल रियर कॅमेरा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापैकी एक वाइड अँगल सेन्सर तर दुसरा टेलिफोटो लेन्स असणार आहे. दोन्हीचे सेन्सर्स OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशन)असणार आहेत. तसेच रेटिना डिस्प्लेसह 3D टच फीचर देण्यात आले आहे.

आयफोन Xs आणि आयफोन Xs Max ची वैशिष्ठ्ये –

हे दोन्ही फोन गोल्ड, सिल्व्हर आणि स्पाईसी ग्रे अशा तीन रंगात उपलब्ध आहेत.

५१२ जीबीचे स्टोअरेज सोबतच यामध्ये IOS – १२ प्रोसेसर असणार आहे.

हा फोन ड्यूअल सिम आहे.

वाटरप्रूफ (दोन मीटर पाण्यात ३० मिनीटांपर्यंत राहिल्यास काही होणार नाही)

आयफोन Xs साठी ५.८ इंच सुपर रेटिना ओलेड(OLED) डिस्प्ले, तर आयफोन Xs Max साठी ६.५ इंच सुपर रेटिना ओलेड(OLED) डिस्प्ले देण्यात आला आहे.

आयफोन Xs Max ३डी टच असणार आहे.

iPhone XR ची  वैशिष्ठ्ये –

हा आयफोनदेखील ३ विविध रंगामध्ये मिळणार आहे.

या आयफोनला देण्यात आलेल्या haptic टचसह, आयफोनचा डिस्प्ले ६.१ इंच असणार आहे.

बॅटरी आयफोन ८ पेक्षा दीड तास आधिक चालणार आहे.

ए-१२ बायॉनिक हा अधिक वेगवान प्रोसेसर या आयफोनमध्ये समाविष्ट आहे.

फेस आयडी या फिचरमुळे चेहऱ्याच्या आधारे तुम्ही फोन अनलॉक करू शकणार आहात.

या फोन व्यतिरिक्त अॅपलच्या नव्या घड्याळामध्ये लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी असे तीन हार्ट फिचर आहेत. म्हणजेच या घड्याळाद्वारे हृदयाचे ठोके मोजता येणार आहेत. तसेच नव्या अॅपल वॉच सिरीज ४ मध्ये आधीपेक्षा ३० टक्के मोठी स्क्रीन आहे. यात ईसीजीची देखील सुविधा आहे. यामुळे भारतात अॅपल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे मत आहे.

आत्तापर्यंत अॅपलच्या सर्वच उत्पादनांना भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे आता ही नवी गॅझेट काय धुमाकूळ घालतील हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.