Apple Event on 8th March: अॅप्पल कंपनी M1, M2 चिपसह धमाकेदार प्रोडक्ट्स करणार लॉन्च
Apple कडून आपला नवा मॅकबुक प्रो (MacBook Pro), मॅकबुक एअर (MacBook Air), मॅक मिनी (Mac Mini) आणि आयमॅक प्रो (iMac Pro) लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Apple Event on 8th March: Apple कडून आपला नवा मॅकबुक प्रो (MacBook Pro), मॅकबुक एअर (MacBook Air), मॅक मिनी (Mac Mini) आणि आयमॅक प्रो (iMac Pro) लॉन्च करण्याची शक्यता आहे. अशी जोरदार चर्चा सुरु आहे की, हे सर्व प्रोडक्ट्स अॅप्पल M1 आणि M2 सिलिकॉनवर आधारित असणार आहेत. कंपनीने 8 मार्चला एका कार्यक्रमातून ग्राहकांना आमंत्रित केले आहे.(Oppo Find X5, Find X5 Pro स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि खास स्पेसिफिकेशन्स)
नव्या मॅक मशीनसह असा अंदाज लावला जात आहे की, दीर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेल्या iPhone SE3 किंवा iPhone SE+5G किंवा 5G iPhone SE सोबत आपले नवे iPad Air सुद्धा लॉन्च केले जाऊ शकतात. 8 मार्चला हा इवेंट वर्च्युअल पद्धतीने पार पडणार आहे. अॅप्पलकडून या इवेंटला 'पीक परफॉर्मेंस' असे म्हटले जात आहे.
कंपनीचा हा इवेंट 8 मार्टला सकाळी 10 वाजता पीएसटी (भारतीय वेळेनुसार 11.30 वाजता) असणार आहे. हा इवेंट कंपनीच्या वेबसाइटवर आणि अॅप्पल टीव्ही अॅपच्या माध्यमातून लाइव्हस्ट्रिम केला जाणार आहे. तसेच इवेंट कंपनीच्या अधिकृत युट्युबवर सुद्धा पाहता येण्याची शक्यता आहे.
Tweet:
ब्लूमबर्गच्या मार्क गुरमन यांच्याद्वारे करण्यात आलेल्या घोषणेनुसार अॅप्पल एक नव्या M2,M1 Pro, M1 Max आणि M1 Max च्या सुपर-पावर्ड वर्जनच्या आधारावर आपल्या नव्या मॅक लाइनअपचे लॉन्चिंग करणार आहे. नव्या मॅकबुक प्रो, मॅकबुक एअर आणि मॅक मिनी मध्ये M2 चिप असण्याची शक्यता आहे. तर नव्या आयमॅक प्रो M1 Pro आणि M1 Max चा ऑप्शन आणि मॅक मिनी M1 Pro सह येण्याची शक्यता आहे.(Jio, Airtel आणि Vi चे अनलिमिडेट डेटासह कॉलिंगचे प्लॅनची किंमत 200 रुपयांहून कमी, जाणून घ्या अधिक)
मॅकबुक एअरच्या व्यतिरिक्त अॅप्पल या इवेंटमध्ये आयफोन एसई 3 घेऊन येण्याची शक्यता आहे. याचे काही वेरियंट सुद्धा असतील अशी चर्चा आहे. तर नव्या आयफोनमध्ये एक सारखे डिझाइन असू शकते जे iPhone SE (2020) सह येणार आहे. दरम्यान यामध्ये 5G सपोर्ट मिळू शकतो आणि A15 बायोनिक SoC सह येऊ शकतो. अशी सुद्धा चर्चा आहे की, यामध्ये यापूर्वी पेक्षा उत्तम रियर कॅमेरा मिळू शकतो. याची किंमत 22,700 रुपये असण्याची शक्यता आहे.