Android युजर्ससाठी मोठी बातमी, सप्टेंबर महिन्यानंतर 'या' स्मार्टफोनमध्ये Google चे एकही App काम करणार नाही

कारण गुगल अशा अॅन्ड्रॉइड वर्जनमध्ये काम करणार नाही आहे ज्यामध्ये लॉग-इनचे सपोर्ट दिलेले नाही. यामध्ये 2.3.7 किंवा त्यामधील कमी वर्जनमधील चालणाऱ्या अॅन्ड्रॉइड फोनचा यामध्ये समावेश आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. कारण गुगल अशा अॅन्ड्रॉइड वर्जनमध्ये काम करणार नाही आहे ज्यामध्ये लॉग-इनचे सपोर्ट दिलेले नाही. यामध्ये 2.3.7 किंवा त्यामधील कमी वर्जनमधील चालणाऱ्या अॅन्ड्रॉइड फोनचा यामध्ये समावेश आहे. या डिवाइसमध्ये गुगलचे एक ही अॅप काम करणार नाही आहे. दरम्यान, युजर्सच्या फोनमध्ये असलेल्या ब्राउजरच्या माध्यमातून गुगल सर्च ते साइन-इन पर्यंतचा ऑप्शन मात्र मिळणार आहे. हे बदल 27 सप्टेंबर 2021 पासून होणार आहेत. ही माहिती कंपनीने पाठवण्यात आलेल्या ईमेलच्या द्वारे समोर आली आहे.(OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर)

9टू5गुगलच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, त्या युजर्सला मेल करण्यात आला आहे जे सध्या जुने अॅन्ड्रॉइड वर्जन असणारे डिवाइस वापरत आहेत. कंपनीने जुन्या अॅन्ड्रॉइड वर्जला बंद करण्यामागील कारण सुद्धा सांगितले आहे. त्यांनी असे म्हटले की, आमचे हे पाऊल युजर्सचा खासगी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी उचलण्यात आले आहे. 27 सप्टेंबर नंतर जर अॅन्ड्रॉइड 2.3.7 किंवा त्याहून कमी वर्जन असलेल्या अॅन्ड्रॉइड डिवाइसमध्ये गुगलचे कोणतेही अॅप चालणार नाही आहे. तुम्हाला युजरनेम किंवा पासवर्ड एरर असा मेसेज दाखवला जाईल.(Upcoming Laptop: शाओमीचा सब-ब्रँड रेडमी भारतात पहिला लॅपटॉप करणार लाँच, जाणून घ्या कधी येणार बाजारात ?)

गुगलचे अॅप डिवाइसमध्ये चालणार नसल्याने तुम्ही नवे डिवाइस घेऊ शकता. भारतीय बाजारात पोको एम3 प्रो आणि रेडमी नोट 10टी सारखे बजेटफ्रेंडली स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्यामध्ये लेटेस्ट अॅन्ड्रॉइड वर्जनचा सपोर्ट दिला गेला आहे. या व्यतिरिक्त यामध्ये दमदार बॅटरी, एचडी डिस्प्ले आणि पॉवरफुल कॅमेरा मिळणार आहे.