Amazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स

हा सेल 48 तास अॅक्टीव्ह असणार आहे. अॅमेझॉन प्राईम डे सेल मध्ये ग्राहकांना 75% पर्यंत डिस्काऊंट मिळेल.

Amazon Prime Day Sale 2021 (Photo Credits: Amazon/Official Site)

अॅमेझॉन प्राईम डे सेल 2021 ला (Amazon Prime Day sale 2021) उद्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. हा सेल 48 तास अॅक्टीव्ह असणार आहे. अॅमेझॉन प्राईम डे सेल मध्ये ग्राहकांना 75% पर्यंत डिस्काऊंट मिळेल. या दोन दिवसीय सेलमध्ये मोबाईल्स (Mobiles), इलेक्ट्रानिक्स (Electronics), लॅपटॉप्स (Laptops), होम अपलायन्सेस (Home Appliances) यांच्यावर भरगोस सूट मिळणार आहे. या सेलमध्ये जास्तीत जास्त डिस्काऊंट मिळवण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा... (Amazon Prime Day Sale 2021: iPhone 11, OnePlus 9R, Galaxy M31s या स्मार्टफोन्सवर 40% सूट; लॅपटॉप्सवर जबरदस्त डिस्काऊंट)

डेबिट/क्रेडिट कार्ड डिस्काऊंट:

अॅमेझॉन प्राईम डे सेल मध्ये एचडीएफसी बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास काही ठराविक प्रॉडक्ट्सवर 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे.

अॅमेझॉन नोटिफिकेशन्स:

सेल चालू असताना अॅमेझॉन नोटिफिकेशन्सवर खास लक्ष ठेवा. यामध्ये तुम्हाला डिल्स आणि ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे. मोबाईल अॅपमधील अॅमेझॉन नोटिफिकेशन अनेबल असल्याची खात्री करुन घ्या.

26 जुलै ची वाट पाहू नका:

अॅमेझॉन प्राईम डे सेल हा 26 जुलै म्हणजेच आज मध्यरात्री सुरु होणार आहे. त्यामुळे रात्री 12 नंतर तुम्ही यावरील ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

प्राईम डे सेल पेज:

सेल सुरु होण्यापूर्वी अॅमेझॉनच्या प्राईम डे सेल पेजला नक्की भेट द्या. यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये किती डिस्काऊंट मिळेल याची तपशीलवार माहिती मिळू शकेल.

लायटनिंग डिल्स:

सेल सुरु झाल्यानंतर लायटनिंग डिल्सवर लक्ष ठेवा. यामध्ये तुम्हाला अधिक डिस्काऊंट मिळू शकेल. यासोबतच सेलच्या दोन्ही दिवशी संध्याकाळी 4-6 च्या मध्ये Wow Deals सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील.

पेमेंट डिटेल्स सेव्ह करा:

सेल सुरु होण्यापूर्वी तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या डिटेल्स अॅमेझॉन अॅप/वेबसाईट मध्ये सेव्ह करुन ठेवा. त्यामुळे प्रॉडक्ट खरेदी करतानाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करता येईल.

अॅमेझॉन पे:

अॅमेझॉन पे मध्ये आधीपासूनच पैसे अॅड केल्यास प्रॉडक्ट्स खरेदी करताना तुम्हाला एक्स्ट्रा कॅशबॅक मिळू शकतो.

विश लिस्ट:

सेल सुरु होण्यापूर्वीच तुम्हाला हवे असलेले प्रॉडक्ट्स विश लिस्टमध्ये अॅड करुन ठेवा. त्यामुळे सेल सुरु होताच तुम्ही लगेच खरेदी करु शकता.

तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा असल्यास आणि त्या प्रॉडक्टवर चांगले डिस्काऊंट मिळत असल्यास त्या ऑफरचा जरुर लाभ घ्या. सेलमध्ये खरेदी करणे अनेकदा फायद्याचे ठरते. मात्र काही गोष्टींची दक्षता घेऊनच खरेदी करा.