Amazon Pay ची बंपर कॅशबॅक ऑफर; मिळेल 4000 पर्यंत कॅशबॅक
Amazon Pay च्या या ऑफरमुळे Paytm, Mobikwik यांसारख्या मोबाईल वॉलेट कंपन्यांसमोर आव्हान उभे राहणार आहे.
Amazon ची मोबाईल वॉलेट सर्व्हीस Amazon Pay भारतीय बाजारात विस्तारीत होण्याच्या तयारीत आहे. अधिकाधिक युजर्सने Amazon Pay चा वापर करावा, यासाठी बंपर कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे. मोबाईल फोनच्या रिचार्जपासून ते बिल पेमेंट्स पर्यंत सर्वांवर कॅशबॅक मिळत आहे. ही ऑफर 21 डिसेंबरपर्यंत असणार आहे. यात तुम्हाला 4000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. Amazon Pay च्या या ऑफरमुळे Paytm, Mobikwik यांसारख्या मोबाईल वॉलेट कंपन्यांसमोर आव्हान उभे राहणार आहे. तर जाणून घेऊया या खास कॅशबॅक ऑफर्स बद्दल...
मोबाईल रिचार्जवर ऑफर
Amazon Pay वरुन मोबाईल रिचार्ज केल्यास तुम्हाला प्रत्येक रिचार्जवर 30% पर्यंत कॅशबॅक मिळेल. यात जास्तीत जास्त 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येईल. त्याचबरोबर तुम्हाला रीपीट कॅशबॅक देखील दिला जाईल. यात तुम्हाला 30 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.
बिल पेमेंटवर ऑफर
Amazon Pay वरुन पोस्टपेड बिल, लाईट बिल, पाण्याचे बिल, डीटीएच रिचार्ज केल्यास तुम्हाला कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. याशिवाय ब्रॉडब्रँड कनेक्शनच्या रिचार्जवर देखील कॅशबॅक मिळेल.
फूड ऑर्डर केल्यास मिळेल ऑफर
Amazon Pay वरुन फूड ऑर्डर केल्यास पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 75 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. याशिवाय पहिल्या ऑर्डरवर तुम्हाला 50 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. यात तुम्हाला फूड ऑर्डर करण्यासाठी लिडींग फूड प्रोव्हायडर्सचे पर्याय उपलब्ध आहेत.
मूव्ही तिकीट
Amazon Pay वरुन BookMyShow च्या माध्यमातून तिकीट बूक केल्यास तुम्हाला 25% कॅशबॅक मिळेल. यात तुम्हाला जास्तीत जास्त 150 रुपये कॅशबॅक मिळू शकते. याशिवाय फक्त तिकीटांवर 100 रुपये आणि गो इव्हेंट्सवर 250 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळेल.
ट्रव्हल तिकीट बुकींग
Amazon Pay वरुन ट्रॅव्हल तिकीट बुक केल्यास तुम्हाला 25% चे डिस्काऊंट मिळेल. याशिवाय जास्तीत जास्त 75 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. याशिवाय फर्स्ट टाईम युजरला 125 रुपयांचे कॅशबॅक दिले जात आहे. Redbus वरुन तिकीट बुक केल्यास 25% कॅशबॅक आणि जास्तीत जास्त 75 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. Amazon Prime यूजर्सला 50 रुपयांचे अतिरिक्त कॅशबॅक दिले जात आहे.