Amazon Mega Home Summer Sale: 7 मार्चपर्यंत अॅमेझॉनचा मेगा होम समर सेल; AC, TV, फ्रिजसह 'या' वस्तूंवर मिळणार आकर्षक ऑफर्स

हा सेल 4 ते 7 मार्चपर्यंत असेल. यादरम्यान ग्राहकांना होम अप्लायन्स, टीव्ही, फर्नीचर, टॉयज आणि इतर समर प्रॉडक्ट्सवर आकर्षक ऑफर देण्यात येईल.

Amazon Mega Home Summer Sale (Photo Credits: Amazon Official Site)

ई-कॉमर्स फ्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर (Amazon) होम समर सेल (Mega Home Summer Sale) ला सुरुवात झाली आहे. हा सेल 4 ते 7 मार्चपर्यंत असेल. यादरम्यान ग्राहकांना होम अप्लायन्स, टीव्ही, फर्नीचर, टॉयज आणि इतर समर प्रॉडक्ट्सवर आकर्षक ऑफर देण्यात येईल. मेगा होम समर सेल दरम्यान ग्राहकांना एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, वोल्टास, सिम्फनी आणि अन्य समर प्रॉडक्ट्सवर बंपर सूट मिळेल.

7500 रुपयांच्या शॉपिंगवर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड ईएमआय आणि डेबिट कार्ड ईएमआय च्या माध्यमातून पेमेंट केल्यावर इन्स्टंट 10 टक्के डिस्काऊंट मिळेल. या ऑफर अंतर्गत 1500 रुपयांचा डिस्काऊंट देखील दिला जाईल. त्याचबरोबर मेगा होम समर सेल मध्ये अफोर्डेबल नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर्स, शेड्युल डिलिव्हरी आणि इंस्टॉलेशन या सुविधा देखील देण्यात येणार आहेत.

या सेलमध्ये स्प्लिट इन्‍वर्टर एसी 22,999 रुपायांना मिळत आहे. तर विंडो एसी 17,490 रुपयांत खरेदी करता यईल. अॅमेझॉन बेसिक्सचा स्प्लिट एसी 22,499 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होईल. व्होल्टास, डाकिन, एलजी, व्हर्लपूल, सान्यो आणि इतर सारख्या ब्रँडच्या एअर कंडिशनर्सवर 40 टक्के सवलत मिळेल. एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, गोदरेज यासारख्या टॉप ब्रँडच्या रेफ्रिजरेटरवर 35 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.

सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, बॉश, आयएफबी आणि इतर टॉप ब्रँडच्या सर्वाधिक विक्री करणाऱ्या वॉशिंग मशीनवर 35 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सिम्फनी, सॅमसंग, क्रॉम्प्टन, बजाज, हेव्हल्स आणि इतर सारख्या ब्रँड्सच्या कूलरवर 40 टक्क्यांपर्यंत सवलत उपलब्ध असेल. तर कूलर, फॅन्स, मिक्सर, वॉटर प्युरिफायर्स, स्वयंपाकघर आणि घरातील उपकरणे यावर 50 टक्के सवलत मिळेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif