Amazon Halo फिटनेस बॅन्ड लॉन्च, बॉडी फॅट संदर्भातील देणार अचूक माहिती

Amazon Halo (Photo Credits-Twitter)

सध्याच्या काळात लोक आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यासाठी विविध उपाय करतात. त्याचसोबत फिटनेस बॅन्ड सुद्धा बहुतांश जण खरेदी करताना दिसून येतात. हिच गोष्ट लक्षात घेता Amazon ने त्यांचा खास Amazon Halo फिटनेस बॅन्ड अमेरिकेत प्रथम लॉन्च केला आहे. या फिटनेस बॅन्डची खासियत म्हणजे युजर्सला फिटनेस ट्रेकिंग आणि हार्ट-रेटसह बॉडी फॅटची सुद्धा माहिती दिली जाणार आहे.(SkyDrive Flying Car: जपानी कंपनी निर्मित हवेत उडणाऱ्या गाडीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण Watch Video)

 Amazon Halo फिटनेस बॅन्डची किंमत 64.99 डॉलर (4764 रुपये) आहे. हा बॅन्ड कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन खरेदी करता येणार आहे. सध्या हा कंपनीने फिटनेस बॅन्ड भारतात कधी लॉन्च करणार याबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. या बॅन्डमध्ये डिस्प्ले देण्यात आलेला नाही. परंतु याचा वापर करुन कार्डिओ, बॉडी फॅट आणि टोन ट्रॅकिंग सारखे फिचर्स दिले आहेत. यामध्ये सर्वाधिक खासियत म्हणजे बॉडी स्कॅनिंग फिचर आहे. त्यामुळे बॉडी फॅट बद्दल माहिती मिळते. परंतु युजर्सला यासाठी मेंबरशिप खरेदी करावी लागणार आहे.

फिटनेस बॅन्डच्या अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये दोन मायक्रोफोन दिले आहेत. ते एका बटणाच्या सहाय्याने ऑन आणि ऑफ करता येणार आहेत. या व्यतिरिक्त एक एलईडी इंडिकेटर लाईट सुद्धा दिली आहे. या फिटनेस बॅन्डला 5ATM ची रेटिंग मिळाली आहे.युजर्सला हा बॅन्ड वापरुन स्विमिंग सुद्धा करता येणार आहे. तसेच जीपीएस आणि वाय-फाय सपोर्ट ही दिला आहे. तर अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्सला पण Amazon Halo फिटनेस बॅन्डचा वापर करता येणार आहे.(LG कंपनीचा अनोखा इलेक्ट्रिक मास्क, कोरोनाच्या व्हायरसच्या सारख्या परिस्थितीत करेल मदत)

Amazon इंडियाने मार्च महिन्यात त्यांच्या युजर्सला उत्तम शॉपिंग अनुभव देण्यासाठी अलेक्सा सपोर्टसह वॉइस कमांड फिचर जाहीर केले होते. या वॉइस कमांडर फिचरच्या मदतीने युजर्सला फक्त बोलून शॉपिंगचा आनंद घेता येणार आहे. हे फिचर फक्त अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी रोलआउट केले होते. परंतु लवकरच आयओएस प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, युजर्सला वॉइस कमांडचा वापर करुन त्यांच्या आवडीचे प्रोडक्ट सर्च करु शकतात. ऐवढेच नाही तर प्रोडक्ट सुद्धा निवडण्यासह आपली ऑर्डर स्टेटस सुद्धा ट्रॅक तपासून पाहता येणार आहे. हे फिचर वॉइस कमांड फक्त इंग्रजी भाषा सपोर्ट करणार आहे. परंतु हिंदी भाषा यासाठी उपलब्ध करुन दिली जाण्याची शक्यता आहे.