Amazon Great Indian Festival Sale 2023: या वर्षीच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची 2023 ची घोषणा; जाणून घ्या मिळणाऱ्या ऑफर्स आणि सवलती
आगामी नवरात्री, दसरा, दिवाळी अशा सणांना डोळ्यासमोर ठेऊन या सेलचे आयोजन केले गेले आहे. या सेलद्वारे ग्राहकांना आवश्यक वस्तू खरेदी करण्याची आणि पैसे वाचवण्याची एक उत्तम संधी मिळू शकते.
ई-कॉमर्स कंपनी Amazon चा सर्वात मोठा सेल- Great Indian Festival Sale 2023 लवकरच सुरु होणार आहे. अहवालानुसार येत्या 10 ऑक्टोबरपासून हा सेल सुरु होईल. काही अहवालांमध्ये या सेलची तारीख 4 किंवा 5 ऑक्टोबर नमूद केली आहे. मात्र याबाबत अजूनतरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कंपनीने आपल्या शॉपिंग अॅपवर म्हटले आहे की, प्राइम ग्राहकांसाठी या सेलच्या ऑफर्स लवकर सुरू होतील. नुकतेच फ्लिपकार्टने देखील आपल्या फेस्टिव्हल फ्लॅगशिप सेलची घोषणा केली होती. मात्र हा सेल कधी सुरु होणार याचीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सर्वसाधारणपणे दोन्ही कंपन्यांचे सेल एकाच वेळी सुरु होतात.
दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या सणासुदीच्या हंगामातील हा सेल कंपन्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. सणासुदीच्या काळात ग्राहक खूप उत्साही असतात, त्यामुळे खरेदीच्या शक्यता वाढतात. यंदा सणासुदीच्या हंगामातील विक्री वार्षिक 20 टक्क्यांनी वाढून 90,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
आताच्या Amazon च्या सेलमध्ये दैनंदिन घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फॅशन, गृहसजावटीची उत्पादने, फर्निचर अशा अनेक गोष्टींवर सवलत उपलब्ध असणार आहे. हा सेल प्राइम सदस्यांसाठी 24 तास अगोदर लाईव्ह केला जाईल. तुमच्याकडे प्राइम मेंबरशिप नसेल, तर तुम्ही ती आता घेऊ शकता. तुम्ही Amazon Great Indian Festival Sale मध्ये SBI कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला अतिरिक्त सवलत मिळेल. (हेही वाचा: WhatsApp UPI Payment: व्हॉट्सअॅपद्वारे आता फक्त चॅटच नाही तर, करता येणार युपीआय पेमेंटही; Meta ने व्यवसायासाठी सुरु केली नवीन सर्व्हिस)
मिळणाऱ्या सवलती-
या सेलमध्ये मोबाइल आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
लॅपटॉप, पीसी, स्मार्ट डिव्हाइसेस अशा गोष्टींवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
अॅमेझॉन फॅशन आयटम्सवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
टीव्हीवर 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
घरगुती आणि स्वयंपाकघरातील वस्तूंवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
पुस्तके, खेळणी सौंदर्य उत्पादने अशा गोष्टींवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
Amazon Products, Alexa, Kindle अशा गोष्टींवर 55 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
दरम्यान, हा वर्षातील सर्वात मोठा सेल इव्हेंट आहे. आगामी नवरात्री, दसरा, दिवाळी अशा सणांना डोळ्यासमोर ठेऊन या सेलचे आयोजन केले गेले आहे. या सेलद्वारे ग्राहकांना आवश्यक वस्तू खरेदी करण्याची आणि पैसे वाचवण्याची एक उत्तम संधी मिळू शकते.