Amazon Freedom Sale: अ‍ॅमेझॉन फ्रिडम सेलमध्ये 'या' शानदार स्मार्टफोनवर मिळणार भरघोस सूट, जाणून घ्या

ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमधील अ‍ॅमेझॉनच्या फ्रिडम सेलला (Amazon Freedom Sale) आजपासून सुरुवात झाली आहे.अ‍ॅमेझॉनचा हा सेल पुढील चार दिवस म्हणजेच 11 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे.

Amazon Freedom Sale (Photo Credits-Twitter)

ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमधील अ‍ॅमेझॉनच्या फ्रिडम सेलला (Amazon Freedom Sale) सुरुवात होणार आहे.अ‍ॅमेझॉनचा हा सेल पुढील चार दिवस म्हणजेच 11 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. मात्र अ‍ॅमेझॉनच्या प्राइम युजर्ससाठी हा सेल 7 ऑगस्टपासून सुरु करण्यात आला आहे. या सेल दरम्या स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅशनेबल प्रोडक्टस आणि अन्य गोष्टींवर भरघोस सूट ग्राहकांना मिळणार आहे.

या सेलपूर्वी अ‍ॅमेझॉनने वनप्लस, सॅमसंग, अॅपल आणि अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनवर देण्यात येणारी सूट आणि त्याची माहिती शेअर केली आहे. या स्मार्टफोनवर भरघोस सूट देण्यात येणार असल्याचे अ‍ॅमेझॉनकडून सांगण्यात आले आहे.(आकर्षक फिचर्ससह ऑगस्ट महिन्यात लाँच होणारे जबरदस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर)

-Apple iPhone XR

2018 मध्ये लॉन्च करण्यात आलेला अॅपल आयफोन एक्सआर या स्मार्टफोनवर सेल दरम्यान त्याच्या मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आह. गेल्या महिन्यातील अ‍ॅमेझॉनच्या प्राइम डे सेलमध्ये 49,999 रुपयांत ग्राहकांना खरेदी करता येणार होता.

-Samsung Galaxy S10:

सॅमसंग कंपनीच्या फ्लॅगशिपमधील गॅलेक्सी 10 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या सेलमध्ये एक्ससेंज ऑफर्सनुसार 6000 रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 16 MP च्या अल्ट्रा वाइड सेंसर, 6.1 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

-Oppo Reno

ओप्पो कंपनीच्या फ्लॅगशिपमधील लेटेस्ट मॉडेल ओप्पो रेनो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सेलमध्ये एक्ससेंज ऑफर्सअंतर्गत चक्क 5000 रुपयांची सूट मिळणार आहे. या स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 3765mAh बॅटरी आणि 48MP+5MP ड्युअर रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

अ‍ॅमेझॉनच्या या फ्रिडिम सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर सूट देण्यात आली आहे. या संबंधित अधिक महितीसाठी अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन माहिती मिळवू शकतात. तसेच जर तुमच्या शिखाला परवडेल अशा किंमतीवर सूट देण्यात आली आहे.