Amazon Fab Phones Fest Sale: Honor Play, OnePlus 6T, Realme U1, Apple iPhone X या स्मार्टफोन्सवर मिळेल जबरदस्त सूट
हा सेल 11-13 एप्रिल दरम्यान असून या सेलअंतर्गत Phone X, OnePlus 6T, Realme U1 या स्मार्टफोनवर डिस्काऊंट मिळत आहे.
ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर 11 एप्रिलपासून Amazon Fab Phones Fest सेलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल 11-13 एप्रिल दरम्यान असून या सेलअंतर्गत Phone X, OnePlus 6T, Realme U1 या स्मार्टफोनवर डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय Honor, Oppo च्या मिड रेंजच्या स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. गेल्या महिन्यात देखील या सेलचे आयोजन करण्यात आले होते. मात्र गेल्या महिन्यात हा सेलचा लाभ घेता आला नसेल तर यंदाची ही संधी अजिबात दवडू नका. तर जाणून घेऊया सेल अंतर्गत मिळणाऱ्या ऑफर्स:
Amazon Fab Phones Fest सेलअंतर्गत OnePlus 6T हा स्मार्टफोन सर्वात कमी किंमतीत विकला जात आहे. याशिवाय Honor च्या स्मार्टफोनवर 8,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. तसंच नो कॉस्ट EMI चा पर्यायही दिला जात आहे.
Vivo Y83 ची किंमत 15,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन लोएस्ट प्राईज एव्हर म्हणून प्रमोट केला जात आहे. तर Oppo चा अलिकडेच लॉन्च झालेला Oppo F11 Pro शिवाय इतर स्मार्टफोनवर बेस्ट एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्याचबरोबर नो कॉस्ट EMI चा देखील लाभ मिळेल.
या सेलअंतर्गत iPhone X फोनची किंमत 91,000 असून यावर देखील नो कॉस्ट EMI ची ऑफर दिली जात आहे. Realme U1 च्या खरेदीवर तुम्हाला डिस्काऊंट मिळेल. तसंच नो कॉस्ट EMI आणि टोटल डॅमेज प्रोटेक्शन ऑफर दिली जाईल. याशिवाय युजर्सला एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.