Amazon Apple Days Sale: खुशखबर! Apple च्या उत्पादनांवर मिळत आहे 30,000 पर्यंतची सूट; जाणून घ्या ऑफर्स

सेल दरम्यान ग्राहक आयफोन मॉडेलवर 23,000 रुपये आणि मॅकबुकवर तब्बल 30,000 रुपये सवलतीचा फायदा घेऊ शकतात.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन (Amazon) वर अॅपल डेज (Apple Days) या नवीन सेलची घोषणा केली गेली आहे. या सेलमध्ये अॅपल कंपनीच्या सर्वोत्तम फोन्सवर स्पेशल ऑफर दिल्या जात आहेत. तसेच फोन शिवाय अॅपलच्या इतर लोकप्रिय उत्पादनांवर जसे- आयपॅड, वॉच आणि बीट्स हेडफोन्स आणि इयरफोन्स वर देखील डिस्काउंट दिला जात आहे. कालपासून या सेलची सुरुवात झाली असून, हा सेल अॅमेझॉन वर 14 जून पर्यंत सुरू आहे. सेल दरम्यान ग्राहक आयफोन मॉडेलवर 23,000 रुपये आणि मॅकबुकवर तब्बल 30,000 रुपये सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

अॅपल डेझ सेल दरम्यान आयफोन एक्स 64 जीबी (iPhone X 64GB) हा फोन सर्वात कमी किमतीमध्ये विकला जात आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना आयफोन एक्सआर 128 जीबी (iPhone XR 128G) व्हेरिएन्ट वर 17,900 रुपये सवलत देण्यात आली आहे. सोबतच एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडीट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. तर आयफोन एक्सआर 64 जीबी (iPhone XR 64GB)  व्हेरिएन्ट ग्राहक या सेल दरम्यान 58,999 रुपयांना खरेदी करू शकतात. तसेच या फोनवरही ग्राहकांना एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट सवलत दिली जात आहे. (हेही वाचा: Amazon Fab Phone Fest सुरु; 'या' स्मार्टफोन्सवर मिळेल जबरदस्त डिस्काऊंट)

या दोन फोनवर भरघोस सूट –

या अॅपल डेझ सेल दरम्यान निवडक अॅपल iPads वर 3,500 रुपये पर्यंत सवलत दिली जात आहे. शिवाय ग्राहक अॅपल वॉच सिरीज मॉडेलवर 5,500 रुपये सवलतीचा फायदा घेऊ शकतात. त्याचप्रमाणे अॅपल बीट्स हेडफोन्स आणि इयरफोन्स वर ग्राहकांना 5,800 रुपये सवलत दिली जात आहे. या 5 दिवसीय सेल दरम्यान ग्राहक अॅपल ऍक्सेसरीजही सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात.



संबंधित बातम्या