Amazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं?

याकरिता केवळ "Alexa, where can I get a COVID-19 test?" असा प्रश्न विचारायचा आहे.

Amazon Alexa (Photo Credits-Twitter)

जगात अजूनही कोविड 19 ची दहशत कमी झालेली नाही. या आजारासोबतच अफवांचे, खोट्या बातम्यांचं पीक देखील मोठ्या प्रमाणात आलेलं पहायला मिळालं. या काळात खात्रीलायक माहिती नेमकी कुठली हा प्रश्न सर्वसामान्यांना होता. कोविड 19 जागतिक महामारीच्या काळात अनेक टेक कंपन्यांनी नेमकी हीच गरज ओळखून अनेक छोटे मोठे प्रयत्न केले आहेत. त्यापैकी एक अमेझॉन. अमेझॉनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता अलेक्सा (Alexa) वर मोठा बदल करण्यात आला आहे. आता तुम्हांला नजिकच्या कोविड टेस्टिंग सेंटरची किंवा कोविड 19 वॅक्सिनेशन सेंटरची माहिती अलेक्सा देणार आहेCOVID-19 Vaccination: कोविड 19 लसीकरणासाठी जवळचं केंद्र Google Maps च्या मदतीने कसं शोधाल पहा स्टेप बाय स्टेप.

2020 मधे अमेझॉन कडून अलेक्सा मध्ये भारतात स्मार्ट असिस्टंट द्वारा कोविड 19 च्या लक्षणांची माहिती, रूग्णसंख्येची माहिती दिली जात होती. पण आता या सेवेमध्येच वाढ करण्यात आली आहे. कोविड 19 वर नागरिकांचेऐ फसवणूक टाळण्यासाठी आता लसीकरण केंद्र, व्हॅक्सिनची उपलब्धता, कोविड 19 हेल्पलाईन नंबर हे देखील शेअर केले जाणार आहेत.अमेझॉनच्या माहितीनुसार हा डाटा भारत सरकारच्या CoWIN portal, Ministry of Health and Family Welfare चं संकेतस्थळ आणि MapmyIndia वर घेतला जाणार आहे.

अलेक्सा ला आता तुम्ही सहज जवळचं कोविड 19 टेस्टिंग सेंटर, तिथे पोहचायला लागणारा वेळ हे सारं विचारू शकता. याकरिता केवळ "Alexa, where can I get a COVID-19 test?" असा प्रश्न विचारायचा आहे. यानंतर तुमचं डिव्हाईस लोकेशन रजिस्ट्रेशन पाहून नजिकच्या सेंटरची माहिती दिली जाईल.