Alibaba Singles' Day Sale : पहिल्या पाच मिनिटांत $3 बिलियनची कमाई

दरवर्षी वाढत जाणाऱ्या या क्रेझने यंदाही नवा उच्चांक गाठला आहे.

11.11 Sale (Photo Credits: AliExpress)

दरवर्षी चीनमध्ये ११ नोव्हेंबर हा दिवस सिंगल्स डे म्हणून साजरा केला जातो. अँटी व्हॅलेन्टाईन्स डेच्या पार्श्वभुमीवर या दिवासाचं सेलिब्रेशन असत. दरवर्षी ११ नोव्हेंबर ला अलीबाबा या लोकप्रिय ई कॉमर्स साईटवर जागतिक स्तरावर एकदिवसीय शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं . दरवर्षी वाढत जाणाऱ्या या क्रेझने यंदाही नवा उच्चांक गाठला आहे. अमेरिकेपासून भारतापर्यंत या सेलबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

यंदाही Singles' Day सेल ला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. यंदा पहिल्या पाच मिनिटांत $3 बिलियनची कमाई झाली आहे. मागील वर्षी अलीबाबाने 168 बिलियन युआन म्हणजे US$24.15 billion ची कमाई झाली होती. यंदादेखील २०-२५% अधिक कमाई होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये या सेल बाबतची फार क्रेझ नाही.

 

यंदा सुमारे १ बिलियन पॅकेज विकली जाण्याचं अली बाबा समोर टार्गेट आहे. Apple , Xiaomi अशा लोकप्रिय ब्रॅण्डच्या वस्तुंना या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतातही काही वस्तू शिपिंग चार्ज शिवाय पोहचवले जाणार आहेत. मात्र भारतात त्या वस्तू पोहचण्यासाठी सुमारे महिना - दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.