Airtel ची व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्विस Xstream Premium लॉन्च, सिंगल रिचार्जमध्ये मिळणार 15 OTT अॅप्सचे सब्सक्रिप्शन

या सर्विसमध्ये युजरला 15 प्रसिद्ध व्हिडिओ अॅप्सचे सिंगल सब्सक्रिप्शन मिळणार आहे. म्हणजेच या 15 अॅप्ससाठी वेगळा रिचार्ज करावा लागणार नाही आहे.

Bharti Airtel. (Photo Credits: Twitter)

एअरटेलने आपली व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्विस Xtream Premium भारतात लॉन्च केली आहे. या सर्विसमध्ये युजरला 15 प्रसिद्ध व्हिडिओ अॅप्सचे सिंगल सब्सक्रिप्शन मिळणार आहे. म्हणजेच या 15 अॅप्ससाठी वेगळा रिचार्ज करावा लागणार नाही आहे. एअरटेल एक्सट्रिम प्रीमियमची टक्कर Amazon Prime आणि Netflix सोबत होणार असल्याचे बोलले जात आहे.(Mobile Tariff Hike: मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, एअरटेलच्या अधिकाऱ्याने दिले संकेत)

Airtel Xstream Premium चा महिन्याभराचा रिचार्ज प्लॅन 149 रुपयांचा आहे. तर वर्षभराचा प्लॅन 1499 रुपयांना येणार आहे. एअरटेलच्या नव्या व्हिडिओ सर्विसमध्ये लोकल लॅग्वेज मध्ये सर्व कंटेट उपलब्ध असणार आहे. यासाठी एअरटेलने Eros, Now, Sony Liv, Lionsgate सारख्या व्हिडिओ अॅपसोबत हातमिळवणी केली आहे. या सर्विसमध्ये 10,500 हून अधिक सिनेमे आणि शोजसह लाइव्ह चॅनल्स पाहता येणार आहेत.

कंपनीच्या या सर्विसचा लाभ टीव्ही धारकांसह मोबाईल अॅप, टॅबलेट आणि लॅपटॉपसह सेटअप बॉक्स युजर्सला ही घेता येणार आहे. युजरला फक्त QR Code स्कॅन करुन Airtel Xtream अॅप डाउनलोड करावा लागणार आहे. तसेच टीव्हीवर Google Play Store च्या माध्यमातून ही तो डाउनलोड करता येमार आहे. या व्यतिरिक्त एअरटेल डीटीएस केबल टीव्हीवर सुद्धा एक्सट्रिम प्रीमियमच्या सुविधेचा वापर करता येणार आहे.

सध्या भारतात ओटीटी सब्सक्रिप्शनचे मार्केट शेअर जवळजवळ 500 मिलियन डॉलर आहे. जे 2025 या वर्षापर्यंत वाढून 2 बिलियन होण्याची शक्यता आहे. अशातच एअरटेल आपली नवी व्हिडिओ सर्विसच्या माध्यमातून 20 मिलियन नवे पेड युजरला टार्गेट करणार आहे. यमुळे ओटीटी अॅपच्या सब्सक्रिप्शन मध्ये 165 मिलियनहून तीन पट वाढ होण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif