Airtel युजर्सला महागाईचा झटका, प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत केली वाढ
त्यानुसार प्रीपेड प्लॅनमध्ये 25 टक्क्यांनी अधिक वाढ करण्यात येणार आहे.
मोबाईल सेवा देणाऱ्या भारतीय एअरटेलने (Airtel) प्रीपेड प्लॅन्सवरील (Pre-Paid Plans) टॅरिफ दरात बदल करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार प्रीपेड प्लॅनमध्ये 25 टक्क्यांनी अधिक वाढ करण्यात येणार आहे. एअरटेलकडून जाहीर करण्यात आले आहे की, हे नवे दर येत्या 26 नोव्हेंबर पासून लागू केले जाणार आहेत. यामुळे एअरटेल युजर्सला मोठा झटका बसणार आहे. याआधी कंपनीने जुलै महिन्यात पोस्टपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या.
कंपनीचा आता 28 दिवसांचा प्रीपेड प्लॅन 99 रुपयांपासून सुरु होणार आहे. म्हणजेच याच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एअरटेलने 49 रुपयांचा प्लॅन जुलै महिन्यातच हटवला होता. परंतु त्या प्लॅनमध्ये SMS ची सुविधा दिली जात नव्हती. परंतु जर तुम्हाला SMS ची सुविधा हवी असल्यास त्यासाठी 149 रुपयांच्या प्लॅनऐवजी 179 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये 20 टक्क्यांनी वाढ केली आहे. युजर्सला 1GB डेटासह 129 रुपयांचा प्लॅन सुद्धा मिळणार आहे. याची किंमत किंमत आता 265 रुपये केली आहे.(Android युजर्स व्हा सावध! 'हे' 151 Apps फोन मधून तातडीने करा डिलिट)
एअरटेलच्या पॉप्युलर 598 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवण्यात आली आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. यामध्ये दररोज युजर्सला 1.5GB डेटा दिला जातो. मात्र या प्लॅनसाठी तुम्हाला 719 रुपये खर्च करावे लागणार आहे. डेटा टॉपअप आणि दुसऱ्या प्लॅनच्या टॅरिफमध्ये 20 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर रिलायन्स जिओ आणि वोडाफोनने अद्याप प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केलेली नाही. परंतु त्यांच्याकडून सुद्धा प्रीपेड प्लॅनध्ये वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते.