Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel कंपनीने भारतात 5G सेवा आणण्याबाबत उचलले 'हे' मोठे पाऊल
एअरटेल कंपनीने देशात 5G इंटरनेट सेवा लाँच करण्यासाठी क्वालकॉम टेक्नोलॉजीसोबत करार केला आहे.
भारतात 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) सर्वात आधी कोणती टेलिकॉम कंपनी आणते, याबाबत सध्या Airtel, VI आणि Jio मध्ये जोरदार चुरस सुरु आहे. यात एअरटेल आणि जिओ मध्ये कोण आधी भारतात 5G सेवा आणणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात आता जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल एक मोठे पाऊल उचलले आहे. एअरटेल कंपनीने देशात 5G इंटरनेट सेवा लाँच करण्यासाठी क्वालकॉम टेक्नोलॉजीसोबत करार केला आहे. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.
एअरटेल कंपनीने आज शेअर बाजारात ही घोषणा केली आहे. एअरटेल आणि क्वालकॉम मिळून 5G फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस नेटवर्क बनविण्यासाठी काम करणार आहेत. यानंतर इंटरनेट नेटवर्कही अपग्रेड करण्याची शक्यता आहे. यानुसार ब्रॉडबँड इन्फ्रास्ट्रचर अपग्रेड करुन गीगाबीट क्लास होम वायफाय नेटवर्क दिले जाणार आहे. यामुळे घरामध्येही आता तुफान इंटरनेट स्पीड मिळणार आहे.हेदेखील वाचा- Airtel युजर्ससाठी खुशखबर! कंपनीकडून मोफत 6 GB का डेटा, 'ह्या' असतील महत्त्वाच्या अटी
याचाच अर्थ आता एअरटेल 5G सेवा बाबतीत व्हीआय आणि जिओला जबरदस्त टक्कर देणार आहे. यामुळे लोकांना घरबसल्या इंटरनेटचा वेगवान स्पीड मिळणार आहे.
दरम्यान जानेवारीमध्ये एअरटेल आपली 5G इंटरनेट सेवा लाईव केली आहे. यामुळे आता इंटरनेटचा स्पीड आणखी दुप्पट होणार आहे. थोडक्यात आता एअरटेलची 5G इंटरनेट सेवा सुसाट धावणार असं म्हणायला हरकत नाही. नुकताच एअरटेल कंपनीने आपल्या युट्यूब पेज याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. Airtel 5G सर्विस हैदराबादमध्ये कर्मशियली लाइव केली आहे. कंपनीच्या CEO चे म्हणणे आहे की, स्पेक्ट्रम अलॉटमेंटसह Airtel 5G सर्विस सुरु केली जाऊ शकते. कंपनीच्या CEO ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीजवळ 5G Ready नेटवर्क इकोसिस्टम आहे. Airtel 5G सर्विस 1800MHz बँडवर लाइव केली गेली आहे जी NSA (Non Stand Alone) टेक्नोलॉजीवर काम करते.