IPL Auction 2025 Live

Ahmedabad: क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 29.90 लाखांची फसवणूक, आरोपीचा शोध सुरु

याप्रकरणी संदीप फडिया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार संदीपने आपल्या तक्रारीत सांगितले की, ऑक्टोबरमध्ये प्रिया अग्रवाल नावाच्या महिलेने व्हॉट्सॲपद्वारे संपर्क केला होता, जाणून घ्या अधिक माहिती

XXX | Representational image (Photo Credits: pixabay)

Ahmedabad: गुजरातमधील वेजलपूरमध्ये एका व्यक्तीला क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणूक आणि त्यातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 29.90 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी संदीप फडिया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार संदीपने आपल्या तक्रारीत सांगितले की, ऑक्टोबरमध्ये प्रिया अग्रवाल नावाच्या महिलेने व्हॉट्सॲपद्वारे संपर्क केला होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, संदीप फादिया एका शोरूममध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्याने पोलिसांना सांगितले की, महिलेने त्याला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीची माहिती दिली, यासोबतच तिने असेही सांगितले की, ही कंपनी USDT म्हणजेच डॉलरमध्ये व्यवहार करते. यानंतर महिलेने त्याला तीन वेबसाइटच्या लिंक पाठवल्या.

या वेबसाइटला "DeanCoin" हे ब्रँड नाव देण्यात आले. महिलेचे म्हणणे ऐकून फादियाने २६ ऑक्टोबर २०२३ रोजी १ लाख रुपये गुंतवले. यानंतर त्यांना या वेबसाइटवर सात हजार रुपयांचा नफा दाखवण्यात आला.

26 ऑक्टोबर ते 21 डिसेंबर 2023 दरम्यान त्याने एकूण 29.90 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती फादियाने पोलिसांना दिली.

यानंतर फादिया यांना कराची रक्कम म्हणून आणखी 18.64 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले, तेव्हाच त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांनी सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधून फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.