Facebook Messenger App पाठोपाठ आता Instagram, Facebook देखील डाऊन

गेल्या काही तासामध्ये सोशल मीडियावरील लोकप्रिय अप्स डाऊन असलेल्याने नेटकरीही वैतागले आहेत.

Facebook (Photo Credit: Pixabay)

आज सकाळी Facebook Messenger App क्रश झाल्यानंतर आता इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (facebook) देखील जगभरात क्रश झाल्याने नेटिझन्स त्रस्त झाले आहेत. Facebook is down for required maintenance right now, but you should be able to get back on within a few minutes. अशाप्रकारचे मेसेज आज युजर्सना गेल्या तासाभरापासून दिसत आहेत.

फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो दिसत नसल्याची, न्यूज फिडवर माहिती दिसत नसल्याची तकार दिसत आहे. तसेच गेल्या तासाभरापासून फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वेगही मंदावला आहे. गेल्या काही तासामध्ये सोशल मीडियावरील लोकप्रिय अप्स डाऊन असलेल्याने नेटकरीही वैतागले आहेत.

ट्विटरच्या माध्यमातून फेसबुकने जगभरातील अनेक युजर्सना फेसबुक आणि या कंपनीच्या इतर अप्स वापरण्यामध्ये व्यत्यय असल्याची माहिती असल्याचं सांगण्यात आले आहे. लवकरच संबंधित त्रुटी, अडथळा दूर केला जाईल. त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं ट्विट फेसबुकने ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. नेमका कशामुळे हा त्रास होत आहे याचा उलगडा झालेला नाही.