ChatGPT Down: Facebook, Instagram नंतर चॅटजीपीटीही डाऊन; जागतिक स्तरावर वापरकर्त्यांना करावा लागत आहे समस्यांचा सामना

सोशल मीडियावर अनेक यूजर्स चॅटजीपीटी बंद असल्याची माहिती देत ​​आहेत. वेबसाईटवर 'ChatGPT is Currently Unavailable' असा मेसेज दाखवला जात असून कंपनी लवकरच ही समस्या दुरुस्त करेल असेही सांगण्यात येत आहे.

ChatGPT (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

ChatGPT Down: मेटा ॲप्लिकेशन, फेसबुक, इंस्टाग्राम, थ्रेड्स आणि व्हॉट्सॲपला मोठ्या प्रमाणात आउटेजचा सामना करावा लागल्यानंतर काही तासांत गुरुवारी हजारो चॅटजीपीटी (ChatGPT) यूजर्संना समस्यांचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर अनेक यूजर्स चॅटजीपीटी बंद (ChatGPT Down) असल्याची माहिती देत ​​आहेत. वेबसाईटवर 'ChatGPT is Currently Unavailable' असा मेसेज दाखवला जात असून कंपनी लवकरच ही समस्या दुरुस्त करेल असेही सांगण्यात येत आहे.

लोकप्रिय AI वर चालणारा चॅटबॉट, तांत्रिक समस्येमुळे ऑफलाइन झाला आहे. ज्यामुळे जगभरातील लाखो वापरकर्त्यांना सेवेत प्रवेश करण्यासाठी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही वेळापूर्वी सुरू झालेल्या आउटेजचा परिणाम केवळ ChatGPTच नाही तर OpenAI च्या API आणि Sora सेवांवरही झाला आहे.  दरम्यान, कंपनीने, सोशल मीडियावर ही समस्या मान्य केली असून एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आम्ही सध्या एक आउटेज अनुभवत आहोत. आम्ही समस्या ओळखली असून ती निराकरण करण्यासाठी काम करत आहोत. क्षमस्व आणि आम्ही तुम्हाला यासंदर्भात अपडेट देऊ.' (हेही वाचा -Tech Layoffs: यंदा 2024 मध्ये 149,000 पेक्षा जास्त टेक कर्मचाऱ्यांनी गमावली आपली नोकरी; Intel, Tesla, Cisco, Microsoft सह अनेक बड्या कंपन्यांमध्ये झाली मोठी नोकरकपात)

चॅटजीपीटी आउटेजमुळे जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आला आहे. विशेषत: ज्या कंपन्या त्यांच्या प्रकल्पांसाठी OpenAI च्या API वर अवलंबून आहेत त्यांच्या सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. वापरकर्त्यांनी त्यांची निराशा व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. तथापी, बुधवारी जगभरात फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम डाउन होते. लोकांना लॉग इन करण्यात, पोस्ट तपासण्यात आणि संदेश पाठवण्यात अडचणी येत होत्या. मेटानेही या आउटेजला तांत्रिक अडचण असल्याचे सांगत ही समस्या मान्य केली होती. DownDetector च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपवर अनेक ठिकाणी मेसेज पाठवण्यात अडचण येत होती. मात्र, सध्या मेटाचे हे प्लॅटफॉर्म व्यवस्थित काम करत आहेत.