Adani Group To Enter UPI: अदानी समूह Paytm, PhonePe आणि Google Pay शी स्पर्धा करणार; कंपनी स्वत:ची UPI पेमेंट प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत

यासाठी हा समूह बँकांशी भागीदारी करण्यास उत्सुक आहे. अदानी समूह आपल्या अदानी वन ॲपमध्ये नवीन वैशिष्ट्ये एकत्रित करण्याचा विचार करत आहे.

Gautam Adani (PC - PTI)

Adani Group To Enter UPI: आशियातील प्रसिद्ध बिझनेस अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह नव्या व्यवसाय क्षेत्रात उतरण्याची योजना आखत आहे. भारतातील ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट (Digital Payment) प्लॅटफॉर्मची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन, अदानी समूह या सेगमेंटमध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार करत आहे. एका रिपोर्टनुसार, ग्रुपने यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, मार्केटमध्ये असे अनेक प्लॅटफॉर्म आधीच आहेत.

अहवालात असेही म्हटले आहे की, अदानी समूहाने सार्वजनिक डिजिटल पेमेंट नेटवर्क युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर काम करण्यासाठी परवाना मिळविण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. त्यासाठी त्यांच्याकडून चर्चा सुरू आहे. (हेही वाचा -BharatPe आणि PhonePe यांच्यातील ब्रँड नेम्समधील 'Pe' च्या वापरासंदर्भातील कायदेशीर वाद संपला; 5 वर्षांपासून सुरू होता विवाद)

वन ॲप -

याशिवाय, आगामी काळात अदानी समूहाकडून क्रेडिट कार्डबाबत काही घोषणाही करण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी हा समूह बँकांशी भागीदारी करण्यास उत्सुक आहे. अदानी समूह आपल्या अदानी वन ॲपमध्ये नवीन वैशिष्ट्ये एकत्रित करण्याचा विचार करत आहे.  (हेही वाचा -Paytm Layoffs: पेटीएममध्ये पुन्हा एकदा नोकर कपातीची शक्यता; 5,000 ते 6,300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाऊ शकते)

अहवालानुसार, अदानी समूह सरकार-समर्थित ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) द्वारे ऑनलाइन शॉपिंग ऑफर करण्यासाठी देखील बोलणी करत आहे. हे सर्व योग्य प्रकारे केले गेले तर ग्राहकांना अदानी वन ॲपवरून या सुविधांचा लाभ घेता येईल. या वर्षाच्या अखेरीस 2022 ला लॉन्च केले गेले.