5G Service in India: Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel सज्ज; ऑगस्ट महिना अखेरीस सुरू होणार सेवा

एअरटेल ने दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी यामध्ये Ericsson, Nokia आणि Samsung यांच्यासोबत त्यांनी अ‍ॅग्रिमेंट साईन केले आहे

Airtel posters. (Photo Credit: PTI)

भारतामध्ये काही दिवसांपूर्वीच जिओ (JIO) ने 15 ऑगस्ट पासून देशात 5जी सर्व्हिस लॉन्च होऊ शकते असं म्हटलं आहे. पण जिओ पाठोपाठ आता एअरटेल ने देखील आपल्या 5जी सर्व्हिस रोल आऊट बाबतची माहिती दिली आहे. एअरटेल (Airtel) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ते 5 जी नेटवर्क सर्व्हिस (5G Service) जारी करू शकतात.

एअरटेल ने दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी यामध्ये Ericsson, Nokia आणि Samsung यांच्यासोबत त्यांनी अ‍ॅग्रिमेंट साईन केले आहे. जर जिओ 15 ऑगस्टला आपली सर्व्हिस लॉन्च करू शकले नाही तर एअरटेल या स्पर्धेत आघाडी घेऊ शकते. नुकताच भारतातील 5जी लिलाव संपला आहे. एअरटेलने 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 3300 MHz आणि 26 GHz फ्रीक्वेंसी मध्ये 19867.8 MHZ मिळवला आहे. 5G च्या येण्याने बदलणार जग; पाहायला मिळणार 'हे' नवे बदल. 

एअरटेलचे एमडी आणि सीईओ Gopal Vittal यांनी 5जी सर्व्हिस लॉन्च करताना आनंदित आहोत. यासाठीचे करार झाले असून ऑगस्ट महिना अखेरिस ही सेवा सुरू होण्यासाठी सज्ज होत आहे. सर्वोत्तम टेक्नॉलॉजी पार्टनर सोबत काम करून भारतीयांना 5जी कनेक्टिव्हिटीचे सारे फायदे दिले जाणार आहेत. तिन्ही टेलिकॉम कंपनीमध्ये 5जी नेटवर्क टेस्ट करणारा एअरटेल हा पहिला टेलिकॉम ऑपरेटर आहे.