5G Connection in India: 2021 पर्यंत भारताला मिळू शकेल पहिले 5 जी नेटवर्क; 2026 पर्यंत असतील 35 कोटी युजर्स- Report

दूरसंचार कंपनी एरिक्सनने (Ericsson) एका अहवालात दावा केला आहे की, 2026 पर्यंत जगभरात 3.5 अब्ज 5 जी (5 G) कनेक्शन होतील, तर भारतात त्यांची संख्या जवळपास 35 कोटी असेल.

5G Mobile Network | (Photo courtesy: archived, edited, representative image)

दूरसंचार कंपनी एरिक्सनने (Ericsson) एका अहवालात दावा केला आहे की, 2026 पर्यंत जगभरात 3.5 अब्ज 5 जी (5 G) कनेक्शन होतील, तर भारतात त्यांची संख्या जवळपास 35 कोटी असेल. एरिक्सनच्या नेटवर्क सोल्यूशन्स (दक्षिण-पूर्व आशिया, ओशिनिया आणि भारत) चे प्रमुख नितीन बन्सल म्हणाले की, पुढच्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात स्पेक्ट्रमचा लिलाव झाला तर, 2021 मध्ये भारताला पहिले 5 जी कनेक्शन मिळू शकेल. एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट 2020 (Ericsson Mobility Report 2020) नुसार जगभरातील 1 अब्ज लोक, जे एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के आहेत त्यांच्याकडे 5 जी कनेक्शन आहे.

अहवालानुसार, जगातील 60 टक्के लोकसंख्या 2026 पर्यंत 5G सेवांमध्ये प्रवेश करेल आणि तोपर्यंत 5 जी ग्राहकांची संख्या वाढून 3.5 अब्ज होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भारतातील 5 जी ग्राहकांची संख्या 35 कोटींचा आकडा पार करेल, जी एकूण मोबाइल वापरकर्त्यांपैकी 27 टक्के असेल. बन्सल म्हणाले की, 5 जी सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलाव हा जाहीर केलेली अंतिम मुदतीनुसार 2021 मध्ये झाल्यास, 2021 मध्ये भारताला पहिले 5 जी कनेक्शन मिळू शकेल. (हेही वाचा: Moto G 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या सर्वात स्वस्त 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)

अहवालानुसार, भारतात दरमहा स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्तीचे ट्राफिक 15.7 जीबी आहे, जे जगातील सर्वाधिक आहे. मोबाइल ब्रॉडबँड सेवांच्या कमी किंमती, स्वस्त स्मार्टफोन आणि लोकांकडून ऑनलाइन खर्च केलेला जास्त वेळ या गोष्टी भारतातील मासिक वापराच्या वाढीस हातभार लावतात. अहवालात म्हटले आहे की, 2020 मध्ये भारतात स्मार्टफोनची सदस्यता वाढून 76 कोटी झाली आहे. ते 2026 पर्यंत 7 टक्क्यांच्या सीएजीआरवरून सुमारे 1.2 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, 2020 मध्ये 4 जी हे भारतातील प्रबळ तंत्रज्ञान आहे. एकूण मोबाइल युजर्सपैकी 63 टक्के 4 जी आहेत. यासोबत 3 जी 2026 पर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे.