Tesla Layoffs: टेस्लाच्या वरिष्ठ व्यवस्थापनासह 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार; Elon Musk करत आहेत प्लानिंग

रिपोर्टनुसार, एलोन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी एका मेलमध्ये म्हटले होते की, ते इलेक्ट्रिक वाहन सुपरचार्ज्ड बिझनेसचे वरिष्ठ संचालक रेबेका टिनुची आणि नवीन उत्पादन प्रमुख डॅनियल हो यांच्यासोबत काम करणा-या सर्व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करतील.

Layoffs (PC - Pixabay)

Tesla Layoffs: अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क (Elon Musk) हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. या प्रवासादरम्यान, टेस्ला (Tesla) साठी एक दिलासादायक बातमी आली की चीनने त्यांच्या इलेक्ट्रिक कारवरील बंदी उठवली आहे. दुसरीकडे, टेस्ला कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. द इन्फॉर्मेशनचा हवाला देत रॉयटर्सने वृत्त दिले आहे की, टेस्लाच्या घसरत्या विक्रीमुळे नाराज एलोन मस्क कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनासह शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे.

500 कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नारळ -

रिपोर्टनुसार, एलोन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी एका मेलमध्ये म्हटले होते की, ते इलेक्ट्रिक वाहन सुपरचार्ज्ड बिझनेसचे वरिष्ठ संचालक रेबेका टिनुची आणि नवीन उत्पादन प्रमुख डॅनियल हो यांच्यासोबत काम करणा-या सर्व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करतील. (हेही वाचा - Ola Layoffs: ओला कॅबचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा, कंपनीची 10% नोकरी कपातीची योजना)

रिपोर्टनुसार, टेस्लाच्या सुपरचार्जर ग्रुपमध्ये सुमारे 500 कर्मचारी काम करतात. रिपोर्ट्सचा दावा आहे की रेबेका टिनुची आणि डॅनियल हो हो मंगळवारी बाहेर पडू शकतात. या अहवालात पुढे म्हटले आहे की, टेस्ला आपला खर्च कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास तयार आहे. यासाठी तो आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या तयारीत आहे. अनेक कर्मचारी टेस्लामध्ये सुरू असलेल्या या क्रिया गांभीर्याने घेत आहेत तर काही जण याला सामान्य म्हणत आहेत. यासोबतच द इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, रोहन पटेल यांच्या नेतृत्वाखालील टेस्लाची पब्लिक पॉलिसी टीमही रद्द केली जाऊ शकते.

या महिन्याच्या सुरुवातीला टेस्लाने आपले जागतिक कर्मचारी 10 टक्क्यांनी कमी केले. इलेक्ट्रिक वाहनांची घटती विक्री आणि किंमतीमुळे हे पाऊल उचलत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif