WhatsApp Features: WhatsApp लवकरच घेऊन येणार 5 नवीन फिचर्स, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

आगामी WhatsApp अपडेट येत आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. WhatsApp वापरकर्त्यांचा विचार करून आणि बदलत्या वापरानुसार अॅपमध्ये अपडेट येणार आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

5 Upcoming WhatsApp Features: WhatsApp हे सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. WhatsApp वर नेहमीच नवीन नवीन अपडेट येत असतात. अपडेटमध्ये चॅट डायनॅमिक्समधील बदल, नवीन इमोजी आणि इतर मजेदार वैशिष्ट्ये तसेच गोपनीयता जोडणे इत्यादी अपडेट होत असतात. दरम्यान, पाच आगामी WhatsApp अपडेट येत आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. WhatsApp वापरकर्त्यांचा विचार करून आणि बदलत्या वापरानुसार अॅपमध्ये अपडेट येणार आहेत. अधि फक्त मेसेजसाठी वापरला जाणार WhatsApp अनेक कार्यासाठी उपयोगी पडत आहे. आता WhatsApp च्या माध्यमातून पैसेही पाठवू शकतो. दरम्यान, ग्राहकांची गरज ओळखून  WhatsApp मध्ये अपडेट केले जातात, समोर आलेल्या माहिती नुसार लवकरच 5 नवीन अपडेट होणार आहेत, दरम्यान, त्या विषयी माहिती असावी या उद्देशाने आम्ही संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. 

जाणून घ्या,  WhatsApp अपडेट संबंधी संपूर्ण माहिती 

स्क्रीनशॉट ब्लॉक करणे 

WhatsApp मध्ये आता स्क्रीनशॉट घेण्यावर आळा घातला जाणार आहे. हे वैशिष्ट्य लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. आता तुम्ही सेटिंग्जमध्ये स्क्रीनशॉट ब्लॉकिंग आणि स्क्रीन-रेकॉर्डिंग ब्लॉक सेट करू शकता. 

WhatsApp स्टेटस वर लिंक्स

 आजकाल बहुतेक प्लॅटफॉर्मवर आढळणार्‍या उपयुक्त माहिती स्टेटसवर लिंकच्या माध्यमातून पोस्ट करू शकता.

व्यवसायांसाठी WhatsApp प्रीमियम

व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी WhatsApp प्रीमियम सदस्यता मॉडेलवर देखील काम करत आहे. तसेच टेलिग्राम प्रीमियम सारख्या सेवा पुरवल्या जाणार आहे. तसेच सेवेसाठी पैसे देणाऱ्यांना आणखी फायदा होणार आहे.

WhatsApp Business वापरकर्त्यांना नवीन टूल टॅब 

अॅपच्या मुख्य पृष्ठावर एक नवीन टॅब देखील मिळेल. डावीकडे कॅमेरा टॅब बदलून, व्यवसाय साधन टॅब देण्यात येईल. व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी अॅप-मधील सेटिंग्जमध्ये न जाता व्यवसाय टूलमध्ये  सहजपणे प्रवेश करू शकतील. टूलमध्ये बिझनेस प्रोफाइल मॅनेजमेंट, कॅटलॉग सेटिंग्ज आणि जाहिरातींद्वारे Facebook आणि Instagram सह एकत्रीकरण करू शकतील .

 व्हॉट्सअॅप साइडबार आणि स्टेटस रिप्लाय व्हॉट्सअॅप डेस्कटॉपवर 

नवीन साइडबार आणि स्टेटस रिप्लाय लवकरच सर्व व्हॉट्सअॅप डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी येणार आहे. स्टेटस रिप्लायमुळे व्हॉट्सअॅप फॉर डेस्कटॉप युजर्सना त्यांच्या संपर्कांद्वारे स्टोरी तपासता येतील आणि त्यांना उत्तर देता येईल, जसे तुम्ही फोनवर करू शकता. दरम्यान, साइडबार स्टेटस अपडेट्स टॅब, सेटिंग्ज आणि प्रोफाइलमध्ये सहज प्रवेश करण्यास अनुमती देईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now