48 मेगापिक्सल कॅमेरा, 5 हजार बॅटरी क्षमतेसह जबरदस्त फिचर्स असलेला Redmi Note 10 पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध

याचदरम्यान, शाओमी कंपनीचा रेडमी नोट 10 ने (Redmi Note 10) स्मार्टफोन चाहत्यांना आकर्षित केले आहे.

Redmi Note 10 (Photo Credit: Redmi India)

चीनी कंपनी शाओमीने (Xiaomi) भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी पसंती मिळवली आहे. याचदरम्यान, शाओमी कंपनीचा रेडमी नोट 10 ने (Redmi Note 10) स्मार्टफोन चाहत्यांना आकर्षित केले आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन इंडिया (Amazon India) आणि एमआयच्या (Mi.Com) अधिकृत वेबसाईटवर आज दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनची विक्री सुरु झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हा फोन लॉन्च करण्यात आला होता. यात 48 मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा, ऑक्टाकोर प्रोसेसर, आणि 5000 एमएएच बॅटरी यांसह अनेक धमाकेदार फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

रेडमी नोट 10 स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. एक्वा ग्रीन, फ्रॉस्ट व्हाइट आणि शेडो ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 10% सूट देखील दिली जात आहे. हे देखील वाचा- Gmail Crashing: Android स्मार्टफोनमध्ये गूगलचं इमेल अ‍ॅप डाऊन; अनेकांना इमेल्स पाहणं कठीण

रेडमी नोट 10 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे, जो 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि फुल एचडी + (1,080x2,400 पिक्सल) रिजोल्यूशनसह मिळत आहे. डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 बसवण्यात आला आहे. यात पंच होल सेल्फी कॅमेरा आणि साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 एमपी वाइड-एंगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आले आहे. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 33 व्हॉल्ट फास्ट चार्जिंगसह 5 हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी आली आहे.