Women's IPL: भारतीय महिला आयपीएल स्पर्धेला गव्हर्निंग काऊन्सिलची मान्यता, 4 संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेचे भारतीय क्रिकेटपटूंकडून स्वागत
गव्हर्निंग काऊन्सिलने 4 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असून ती 1 ते 10 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाईल.
युएई येथे पुरुष क्रिकेटपटूंच्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL) दरम्यान महिला आयपीएल (Women's IPL) होणार असल्याच्या बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या गोधनेचे भारतीय क्रिकेटपटूंनी स्वागत केले, पण ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगबरोबर (Big Bash League) हा कार्यक्रम होणार असल्याने परदेशी महिला खेळाडू मात्र निराश आहेत. मार्च महिन्यात टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापासून भारतीय महिला संघ (India Women's Team) एकही सामना खेळलेला नाही. केवळ वनडे सामना खेळणारी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) अखेरची नोव्हेंबरमध्ये खेळली. इंग्लंडचा दौरा रद्द झाल्याने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपपूर्वी महिलांना खेळासाठी जास्त वेळ मिळणार नाही असे दिसत आहे. मात्र, रविवारी गांगुलीच्या घोषणेने काही चिंता कमी केल्या आहेत. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर गव्हर्निंग काऊन्सिलने 4 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असून ती 1 ते 10 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाईल. स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद व इतर बाबींचा अभ्यास केल्यानंतर आगामी काळात महिलांसाठीही आयपीएलचा पूर्ण हंगाम भरवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असल्याचं गांगुलीने म्हटलं. (IPL 2020 Final: 10 नोव्हेंबरला पार पडेल यंदाचा 'आयपीएल' चा अंतिम सामना; पहिल्यांदाच Weekday ला पाहायला मिळणार फायनलची लढत)
"ही उत्कृष्ट बातमी आहे. आमची वनडे वर्ल्ड कपची मोहीम अखेर सुरू होईल. सौरव गांगुली, बीसीसीआय, जय शाह आणि महिला क्रिकेटमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल बोरिया मजूमदार यांचे खूप आभार", भारताची वनडे कर्णधार मिताली राज यांनी ट्विट केले.
सिनिअर फिरकीपटू पूनम यादवने लिहिले: "चांगली बातमी! सौरव गांगुली आणि बीसीसीआय धन्यवाद.
चार संघांत आयोजित होणारे महिला आयपीएल 1-10 नोव्हेंबर दरम्यान होणार असून बिग बॅश 17 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाने ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हेली आणि न्यूझीलंडची दिग्गज सुझी बेट्ससारख्या स्टार परदेशी खेळाडूंना निराश केले. आयपीएलची तयारी जोरात सुरू असताना महिला संघाचा इंग्लंड दौरा रद्द केल्याबद्दल बीसीसीआयला काही टीकेचा सामना करावा लागला. दुसरीकडे, पुरुष आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. भारतात कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाटयाने होणारी वाढ लक्षात घेत हा निर्णय घेतण्यात आला आहे.